केसमुत्ति सुत्त

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:बदल

अलञ्हि वो, कालामा, कङ्खितुं अलं विचिकिच्छितुं। कङ्खनीयेवच पन वो ठाने विचिकिच्छा उप्पन्‍ना। एथ तुम्हे, कालामा, मा अनुस्सवेन, मा परम्पराय, मा इतिकिराय, मा पिटकसम्पदानेन, मा तक्‍कहेतु, मा नयहेतु, मा आकारपरिवितक्‍केन, मा दिट्ठिनिज्झानक्खन्तिया, मा भब्बरूपताय, मा समणोनो गरूति।
यदा तुम्हे, कालामा, अत्तनाव जानेय्याथ – ‘इमे धम्मा अकुसला, इमे धम्मा सावज्‍जा, इमे धम्मा विञ्‍ञुगरहिता, इमे धम्मा समत्ता समादिन्‍ना अहिताय दुक्खाय संवत्तन्तीति, अथ तुम्हे, कालामा, पजहेय्याथ। ( सुत्तपिटक – अंगुत्तरनिकाय - तिकनिपात पाळि (६६) - महावग्ग – केसमुत्ति सुत)
अर्थ
हे कालामा ! तुमच्या मनात शंका आणि चिकीत्सा निर्माण व्हावी हे पर्याप्त आहे, आणि ही शंका आणि चिकीत्सा योग्य स्थानी (वेळी) उत्पन्न झाली आहे। तेंव्हा हे कालामा, (केवळ) ऐकण्याने नाही, पारंपारिकतेने नाही, (पुष्कळ) आढळल्याने नाही, धार्मिक पुस्तकात असल्याने नाही, तर्क-हेतुने नाही, न्याय-हेतुने नाही, जुजबी वितर्काने नाही, अंतर्यामी दृष्टीने समजून नाही, भव्य-रुपाने (भारुन) नाही, श्रमण व जेष्ठांच्या (सांगण्या) ने नाही,
तर हे कालामा, स्वतः जाणून घ्या (की), जे तत्त्व अकुशल आहे, जे तत्त्व सदोष आहे, ज्या तत्त्वांना विद्वान दोषी म्हणतात, ज्या तत्त्वांना संपूर्ण अंगीकारणे सर्वांसाठी अहिताचे आणि दुखाःचे आहे,

हे कालामा, अशा (तत्त्वां)चा (सर्वथा) त्याग करा।