Jump to content

कोइंबतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ

मराठीपिडिया कडून

साचा:Infobox Airport

कोइंबतूर विमानतळ साचा:विमानतळ संकेत हा भारताच्या तामिळनाडू राज्यातील कोईंबतूर येथे असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ह्यास आधी पिलामेडू विमानतळ म्हणुन ओळखले जायचे. हे शहराच्या मध्ध्यापासुन १६ किमी अंतरावर आहे.

इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

कोइंबतूर विमानतळाने प्रथमतः १९४० च्या दशकात नागरी विमानतळ म्हणून काम सुरू केले.इंडियन एअरलाइन्सने तेथे फोकर एफ२७, डग्लस डिसी-३,हॉकर सिडली या विमानांसह उड्डाणे केलीत.पूर्वीच्या दिवसात तेथे फक्त चेन्नई व मुंबई यासाठीच सेवा होती.कोचिन व बंगलोर उड्डाअणे नंतर सुरू करण्यात आलीत.१९८० च्या दशकाचे सुरुवातीस,तो विमानतळ बोइंग ७३७एरबस ए३२० अश्या अत्याधुनिक जेट विमानांना सोईचे व्हावे म्हणुन, धावपट्टी वाढविण्यासाठी बंद ठेवण्यात आला.तात्पुरत्या स्वरुपात,विमाने सुलुर विमानतळ वपरीत होती.धावपट्टीवाढविण्याचे काम झाल्यावर, १९८७ मध्ये,नविन अग्रीय(टर्मिनल)सह सेवा पुर्ववत् करण्यात आली.१९९५ मध्ये, शारजा सेवा सुरू करण्यात आली व कोलंबोसिंगापूरसाठी २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय सेवा पुरविण्यात येउ लागली.

विमानतळ वास्तू[संपादन | स्रोत संपादित करा]

कोइंबतूर विमानतळास सध्या एक विमानतळ अग्रीय (टर्मिनल) व दुसरे निर्माणाधीन आहे.[]

तेथे दोन विमानघरे आहेत- एक खाजगी वाहकांसाठी व दुसरे कोइंबतुर फ्लाईंग क्लब साठी. विमानतळ थांब्यातील गाळे हे जास्तीत जास्त सहा विमाने सामावू शकतात. तेथे एक अग्निशमन केंद्रही आहे.

विमानतळाची एक धावपट्टी साचा:Convert लांबीची आहे. पूर्वी ती धावपट्टी साचा:Convert लांबीची होती. धावपट्टीची लांबी वाढविल्यामुळे बोइंग ७३७एरबस ए३२०सारख्या अत्याधुनिक विमानांना सामावून घेणे शक्य आहे. येथे सध्या उपकरणाधारित अवतरण प्रणाली (इंस्ट्रुमेंट लॅंडिंग सिस्टीम) उभारण्यात येत आहे.[]

याशिवाय येथे धावपट्टीस समांतर खेचमार्ग (टॅक्सी-वे) बांधण्याचे प्रस्तावित आहे. याने विमानाचा धावपट्टी व्यापण्याचा कालावधी कमी होऊन धावपट्टीचा उपयोग अधिकाधिक विमानांच्या आवागमनासाठी करता येईल. सध्या विमानांना धावपट्टीवरच प्रथम चालवून मग उडविण्यात येते. या अधिक विमानाच्या थांब्यासाठी दोन गाळे अधिक वाढविण्याचाही बेत आहे. नवीन अग्रीयात सरक-दरवाजे, हवाई-पूल व सामान हाताळणीसाठीची आधुनिक प्रणाली, इ. आधुनिक सुविधा असतील.[]

विमानतळाचे आधुनिकीकरण व विस्तार[संपादन | स्रोत संपादित करा]

विस्तारीत व आधुनिक केलेले विमानतळ अग्रीय आतापासून दोन वर्षांनी तयार होईल.

या प्रकल्पाच्या निविदेचे काम पूर्ण झाले असून विस्तारीकरण व आधुनिकीकरणासाठी रु. ७८ करोडच्या कामांचे ठेके देण्यात आलेले आहेत.संदर्भांच्या अटीनूसार, ठेका देण्याच्या दिनांकापासून २४ महिन्यात बांधकाम पूर्ण करावयाचे आहे. विस्तारीकरण प्रकल्पात, दोन मजली लोखंड व काचेच्या चौकटीत,चटई क्षेत्र हे ६,००० चौ.मि. पासून १४,००० चौ.मि. पर्यंत वाढविणे अंतर्भूत आहे.या प्रकल्पात,हवाई पूलाची उभारणी,सरकते जीने व चार उद्वहनाचा समावेश आहे.एकवेळची प्रवासी हाताळणीही सध्याच्या ३५० वरून दुप्पट होईल. अतिरिक्त आधारभूत संरचनेमुळे,ज्याचा खर्च रु.१.५० कोटी अपेक्षित आहे,सध्याची एकवेळेस ४० टन माल हाताळण्याची क्षमताही दुप्पट होण्याची अपेक्षा आहे.त्याचे काम सुरूही झाले आहे. झालर(अॲप्रन) विस्तार प्रकल्प, ज्याचे गुंतवणूक मुल्य रु. १२.५० करोड इतके आहे,त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे.या व्यतिरिक्त,रु. ३२ करोडचा समांतर खेच-मार्ग तयार करण्यासाठी प्रकल्प अहवाल सादर करण्यात आलेला आहे.[]

विमानतळाची नवीन अग्रयी इमारत[संपादन | स्रोत संपादित करा]

तेथील संचालकांनी सांगीतले कि येणारे व जाणारे प्रत्येकी १५० प्रवासी ही ईमारत हाताळेल.लवकरच,सध्याची प्रवासी दिर्घिका मोठी व आधुनिक करण्यात येईल.येथे येण्यास राज्य महामार्ग खात्यातर्फे,पोहोच मार्ग व सेवा मार्गांचेही बांधकाम करण्यात आले आहे.[][]

एकात्मिक अग्रयी ईमारत[संपादन | स्रोत संपादित करा]

भा वि प्राधिकरणाने,६१३ एकर जागेची मागणी राज्य सरकारकडे केलेली आहे.या ईमारतीद्वारे, १२०० प्रवासी हाताळता येतील व याचा खर्च रु. २५० करोड राहील.राज्य सरकारने ती जमिन लवकरच देण्याचे मान्य केले आहे.[]

विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Airport-dest-list

मालवाहतूक[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Airport-dest-list

घटना[संपादन | स्रोत संपादित करा]

१७ नोव्हें. २००७:पार्किंगच्या गाळ्यात, १३० प्रवासी असलेल्या, दिल्लीस जाणाऱ्या स्पाईसजेट विमानाचा एक पंख तेथे उभा असलेल्या एर डेक्कनच्या विमानास जवळ-जवळ लागलाच होता.ते विमान वेळीच थांबविण्यात आले व अपघात टळला.[]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:वेबॅक आर्किव्ह

साचा:वेबॅक आर्किव्ह

साचा:भारतातील विमानतळ