कोटला १२ इमाम

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

ही मशिदीला बारा इमामांचे कोताळा (बारा संतांचा किल्ला) असे म्हणतात.इ.स 1536 मध्ये बुर्हान निजाम शाह यांनी त्यांचे मंत्री शाह ताहिर यांच्या मार्गदर्शनाखाली बांधली होती. बुरहान शाहने मशिदी शाह ताहिरच्या ताब्यात दिली आणि ती एक धर्मादाय संस्था आणि महाविद्यालय म्हणून वापरात आली.

कुंपणाची भिंत (91 * 91 मीटर) दगड आणि चुना या पासून तयार केलेली आहे.पूर्वेस व दक्षिण बाजूला दोन दरवाजे आहेत. बारा इमामांचा कोटाला निजामशाही वास्तुकलाचा एक उत्कृष्ठ नमुना आहे, जो त्याच्या कोरलेल्या आणि सजावलेल्या कमानीसाठी प्रसिद्ध आहे.यात तीन आयतांचे एकच प्रार्थना सभागृह आहे, प्रत्येकी पाच पाट्या खोल आहे आणि त्यावर सपाट छत आहे. समतोल वास्तुकला, सुबक रचना आणि उत्तम कारागिरीचे हे अतिशय सुंदर उदाहरण आहे.