कोटा हरिनारायण

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट शास्त्रज्ञ

कोटा हरिनारायण हे एक शास्त्रज्ञ आहेत.

बालपण

श्री. कोटा हरिनारायण यांचा जन्म १९४३ मध्ये ओडिशातल्या बेहरामपूर येथे झाला.

शिक्षण

कोटा यांनी बनारस विश्व हिंदू विद्यापीठातून मॅकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी आणि बंगळूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून एरो इंजिनियरिंगमधील पदव्युत्तर पदवी मिळवली.

कारकीर्द

मुंबईच्या आयआयटीमधून डॉक्टरेट मिळवल्यावर, बंगळूरच्या हिंदुस्थान एरोनॉटिकल्स लि., मध्ये ते दाखल झाले. इ.स. १९८५ मध्ये त्यांनी नवीन तंत्रज्ञान विकसित करून एक हलके लढाऊ विमान निर्माण केले. संपूर्ण स्वदेशी बनावटीचे विमानांचे उत्पादन करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रमही घेतले. या प्रकल्पाच्या संचालकपदाची धुरा त्यांच्याकडे होती. याच संस्थेच्या "एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट' या विभागाचा कार्यभारही त्यांनी सांभाळला. भारतीय संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) त्यांचा १९९५ मध्ये "उत्कृष्ट वैमानिक' म्हणून सन्मान केला होता.

स्वदेशीचा पुरस्कार करणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या या शास्त्रज्ञाने देशात संरक्षण विभागाशी संबंधित असलेल्या क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने व शस्त्रांचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. बंगळूरच्या विमान संस्थेत सेवा करीत असतानाच त्यांनी लष्कराला, विमान दलाला आणि नौदलाला प्रहार करणारी नवी शस्त्रे उत्पादित करून दिली. पहिल्या चालकरहित विमानांच्या उत्पादन प्रकल्पांचा प्रारंभही त्यांच्याच कारकिर्दीत झाला. येत्या पाच वर्षात भारत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पूर्णपणे स्वावलंबी होईल, जगाला तंत्रज्ञानाची निर्यात करेल, असा आत्मविश्वास त्यांना आहे. संशोधन आणि प्रकल्पांची अंमलबजावणी करताना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांनाही, नव्या तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी सतत प्रोत्साहन दिले आहे. अनेक संस्थांनी जीवन गौरव पुरस्काराने त्यांचा सन्मान केला. ते हैद्राबाद विद्यापीठाचे कुलगुरूही होते. सरकारने "पद्मश्री' सन्मानाने त्यांना गौरवले आहे. सध्या चेन्नईच्या "सेंटर फॉर विंड एनर्जी टॅक्नॉलॉजी आणि आयआयटी मुंबईच्या एरोस्पेस संस्थेचे ते अध्यक्ष आणि मानद प्राध्यापक आहेत.

पुरस्कार

संरक्षण विभागासह आधुनिक तंत्रज्ञान देशातच विकसित व्हायला हवे, यासाठी गेली तीस वर्षे तंत्रज्ञ घडवणाऱ्या डॉ. कोटा हरिनारायण यांना नुकतेच लोकमान्य टिळक सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

साचा:विस्तार