खासबाग

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:कॉपीपेस्ट खासबाग हा कोल्हापुरातील कुस्तीचा आखाडा आहे.

राजर्षी शाहू महाराज यांना रोममधील ऑलिम्पिकचे स्टेडियम व ओपन थिएटर पाहिल्यानंतर कोल्हापुरात कुस्ती मैदान साकारण्याची कल्पना सुचली. महाराज कोल्हापुरात परत आल्यानंतर त्यांनी मिरजकर तिकटी येथील राजघराण्यातील माणसांसाठी खास राखून ठेवलेल्या बागेत अर्थात खासबागेत या मैदानाची संकल्पना व आराखडा ठरविला. त्याप्रमाणे रोम येथील मैदानाची प्रतिकृती खासबागेत उभारण्याचे काम सुरू झाले.. इ.स. १९०७ साली हा कुस्तीचा आखाडा बांधण्यास सुरुवात झाली आणि इ.स. १९१२ मध्ये आखाडा बांधून पूर्ण झाला. या संपूर्ण मैदानात सुमारे २५ ते ३० हजार लोक भारतीय बैठकांवर बसू शकतात. मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसले तरी प्रत्येकाला कुस्ती दिसते, हेच या मैदानाचे वैशिष्ट्य आहे.

या मैदानाच्या उद्‌घाटनाच्या वेळी जगज्जेता पहिलवान गामा याचा भाऊ इमामबक्ष ऊर्फ धाकटा गामा व गुलाम मोहिद्दीन यांच्यात लढत झाली होती. हे दोन्ही मल्ल अफाट ताकदीचे असल्याने यावेळी जोरदार लढत पाहायला मिळाली होती. यात इमामबक्षने मोहिद्दीनला अस्मान दाखवले. शाहू महाराजांनी इमामला चांदीची गदा बक्षीस दिली तसेच पराभूत मल्लालादेखील बक्षीस दिले. तेव्हापासून चांदीची गदा देणे आणि पराभूत मल्लांचा सन्मान करणे या परंपरेलाही सुरुवात झाली.

या खासबाग मैदानावर मारुती माने, सादिक पंजाबी, गोगा, दादू चौगुले, बाळू पाटील, लक्ष्मण वडार, विष्णू जोशीलकर, हरिश्चंद्र बिराजदार, नामदेव मोळे, विजय कुमार, झारखंडेराय यांनी आणि शिवाय अनेक पाकिस्तानी मल्लांनी मैदान मारले आहे.

खासबाग मैदानात गाजलेल्या कुस्त्या

  • १९१३ - गुलाम मोहिद्दीन विरुद्ध इमामबक्ष
  • ७ एप्रिल १९२४ - ज्ञानू माने विरुद्ध गुलमहमद कलावाला
  • २१ ऑक्टोबर १९३६ - जगद्‌विख्यात जर्मन पैलवान व्हॉन केमर विरुद्ध मल्लापा तडाखे
  • १७ मार्च १९४० - गामा पंजाबी विरुद्ध शिवगौडा मुत्नाळे
  • १३ मार्च १९७६ - युवराज पाटील विरुद्ध विजयकुमार
  • १ एप्रिल १९७८ - युवराज पाटील विरुद्ध सतपाल
  • १५ एप्रिल १९७८ - दादू चौगुले विरुद्ध सादिक पंजाबी
  • १३ एप्रिल १९७९ - विष्णू फडतारे विरुद्ध रामा माने
  • दादू चौगुले विरुद्ध सतपाल
  • १६ एप्रिल १९८३ - तारिक लाहोरवाला विरुद्ध बाळू पाटील
  • ११ फेब्रुवारी १९८४ - युवराज पाटील विरुद्ध सतपाल
  • लक्ष्मण वडार विरुद्ध बाळू पाटील
  • ७ फेब्रुवारी १९८७ - विष्णू जोशीलकर विरुद्ध नामदेव मोळे
  • ११ फेब्रुवारी १९८९ - गुलाब बर्डे विरुद्ध नामदेव मोळे