खिद्रापूर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

खिद्रापूर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातले एक गाव आहे. हे गाव कृष्णा नदीच्या काठावर वसले आहे. ते कोल्हापूरपासून अंदाजे ८० किलोमीटर दूर व नरसोबाच्या वाडीपासून अदाजे २४ किलोमीटरवर आहे. जयसिंगपूर हे येथून जवळचे रेल्वे स्टेशन आहे. खिद्रापूर गावासाठी कुरुंदवाड बस आगरामधून बसगाड्या सुटतात.

खिद्रापूरचे प्राचीन नाव कोप्पम असे असून प्राचीन काळातील ही एक प्रसिद्ध युद्धभूमी असल्याचे संदर्भ आढळतात.[१]

कोप्पेश्वर महादेव महादेव मंदिर

येथे कृष्णा नदीच्या काठी कोप्पेश्वर महादेवाचे मंदिर आहे. कोल्हापूरपासून ६० कि.मी. वर असलेले असे शिल्पसमृद्ध मंदिर पश्चिम महाराष्ट्रामध्ये क्वचितच पाहायला मिळते. शिलाहार राजवटीमधील स्थापत्याचे हे एक उदाहरण आहे. शिलाहारांचे स्थापत्य हे उत्तर चालुक्य आणि होयसळ स्थापत्याशी मिळतेजुळते आहे. कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर आणि खिद्रापूरचे कोपेश्वर महादेव मंदिर ही त्याची उदाहरणे होत. या मंदिराला स्वर्गमंडप आहे. १३ फूट व्यासाच्या या स्वर्गमंडपात त्याच मापाची त्याखालची रंगशिळा आहे. मंदिरावर विविध देवदेवता, सुरसुंदरी, अष्टदिक्पाल यांच्या मूर्ती, गजधर आहेत. मंदिराचे खांब शिल्पजडित खांब असून देवळास अनेक गवाक्षे आहेत. हे देउळ बऱ्याचअंशी दुर्लक्षित आहे. याच मंदिरापासून जेमतेम २०० फुटावर अगदी याच शैलीमधील जैन मंदिर आहे. मंदिर स्थापत्य शैली आणि मंदिरावरील मूर्ती एकाच शिलाहार काळात केल्याचे जाणवते. [२] [३]

बाह्य दुवे

साचा:विस्तार

संदर्भ

साचा:संदर्भयादी