खिलजी घराणे

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट भूतपूर्व देश खिलजी घराणे (फारसी: سلطنت خلجی, सुलतान-ए-खिलजी; रोमन लिपी: Khilji dynasty;) हे इ.स. १२९० ते इ.स. १३२० या कालखंडात दिल्ली सल्तनतीवर अधिकारारूढ असलेले तुर्की-अफगाण वंशाचे राजघराणे होते. या घराण्याचा शासनकाळ कमी असला, तरीही खिलजी घराण्यातल्या शासकांनी भारतीय उपखंडातील विविध भूप्रदेशांवर केलेल्या आक्रमणांमुळे संपूर्ण भारतीय उपखंडाची राजकीय स्थिती पालटली. या घराण्यातला दुसरा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याने अनेक राजपूत राज्ये, तसेच महाराष्ट्रातील देवगिरीच्या यादवांना पराभूत करून संपवले. भारतीय उपखंडाच्या मोठ्या भूभागावर इस्लामी राज्य सुरू झाले. खिलजी घराण्याच्या काळात झालेल्या मंगोल आक्रमणांना त्यांनी समर्थ प्रतिकार केला. खिलजी घराण्यानंतर दिल्ली सल्तनतीवर तुघलक घराण्याची सत्ता आली.

खिलजी शासक