गंगाधर गाडे
Appearance
गंगाधर गाडे हे एक भारतीय राजकारणी आणि आंबेडकरवादी राजकिय-सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी नेते असून पॅंथर रिपब्लिक पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष आहेत.[१][२] ते महाराष्ट्राचे माजी मंत्री आहेत. ते एक लोकप्रिय बौद्ध नेता आहेत. ते मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनाचे एक प्रमुख नेते होते.[३][४] ७ जुलै १९७७ रोजी दलित पॅंथरचे सरचिटणीस गंगाधर गाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावे, अशी सर्वप्रथम मागणी केली होती.[५][६] इ.स. १९९४ मध्ये, मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असा नामविस्तार केला गेला.
सूर्यकांता गाडे ह्या गंगाधर गाडेंच्या पत्नी तर सिद्धांत गाडे हे पुत्र आहे.