Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
गरबा - मराठीपिडिया Jump to content

गरबा

मराठीपिडिया कडून

गरबा हा नवरात्रात सादर होणारा एक पारंपरिक नृत्यप्रकार आहे.[] भारतातील गुजरात प्रांतात हा प्रकार शारदीय नवरात्र काळात विशेषत्वाने खेळला जातो.[] हे नाव संस्कृतमधील दीपगर्भ या शब्दापासून तयार झाले आहे. []महिलांचा या नृत्यात विशेष सहभाग असतो. काहीवेळा देवीला वंदन करण्यासाठी पुरुष सुद्धा या नृत्यात सहभागी होतात.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
गरबा घट

आशय[संपादन | स्रोत संपादित करा]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
दांडिया नृत्य

महिलांच्या सर्जनशक्तीशी म्हणजेच नवनिर्मितीच्या क्षमतेशी संबंधित हा उत्सव आहे. शारदीय नवरात्रात गरबा नृत्यात मध्यभागी घडा ठेवला जातो. या मातीच्या घड्याला छिद्रे पाडली जातात आणि त्यामध्ये दिवा प्रज्वलित केला जातो. या घड्याभोवती महिला, मुली फेर धरतात आणि देवीची स्तुतीपर गीते म्हणून पारंपरिक नृत्य करतात.[] हा घट अथवा कुंभ हा स्त्रीच्या सर्जन शक्तीचे प्रतीक मानला जातो.[]

सार्वजनिक स्वरूप[संपादन | स्रोत संपादित करा]

गुजरातमधील पारंपरिक धार्मिक आशय असलेले गरबा नृत्य १९८० सालाच्या आसपास सार्वजनिक रूपात केले जाऊ लागले. त्यापुरी मेवाड मधील विविध मंदिरांमध्ये शारदीय नवरात्र काळात हे नृत्य केले जात असे. तरुणाईला आकर्षण वाटावे यासाठी या नृत्याचे स्वरूप आधुनिक केले गेले. पारंपरिक देवी गीतांच्या जोडीने आधुनिक गीते गायली जाऊ लागली आणि त्या तालावर गरबा नृत्य केले जाऊ लागले. दांडिया घेऊन नृत्य करणे हे गरबा नृत्याचे आधुनिक व्यावसायिक रूप आहे.[] गरबा हा कलाप्रकार देवीच्या उपासनेशी आणि मनोरंजनासाठी प्रसिद्ध झाल्याने संपूर्ण भारतभरात गुजराथी आणि अन्य भारतीय नागरिक याचा दरवर्षी शारदीय नवरात्र काळात विशेष आनंद घेतात.[]

द्रुक - श्राव्य स्वरूपात नृत्य[संपादन | स्रोत संपादित करा]

चित्र:Garba dance during Navaratri festival in Mehsana Gujarat India.ogv

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]