गुरू गोविंदसिंह जयंती
Appearance

गुरू गोविंदसिंह जयंती हा शिखांचा वार्षिक उत्सव आहे. [१]ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये भारत, कॅनडा सारख्या देशांत (जिथे शीख समुदाय मोठ्या प्रमाणात आहे) साजरा केला जातो. हा एक धार्मिक सण आहे ज्यामध्ये समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते.
गुरू गोविंदसिंह हे नानकांचे दहावे गुरू होते.[२] त्यांचा जन्म २२ डिसेंबर १६६६ रोजी पटना (बिहार) येथे झाला. त्यांचा वाढदिवस ग्रेगोरीयन कॅलेंडरनुसार कधी डिसेंबर तर कधी जानेवारीमध्ये येतो. गुरूंचा वाढदिवस नानकशाही कॅलेंडरनुसार ठरवला जातो.
शीख धर्मातील महत्त्व[संपादन | स्रोत संपादित करा]
गुरू गोविंदसिंह हे गुरू तेग बहादूर यांचे पुत्र होते. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी वडीलांचा वारसा चलवत ते गुरू बनले. त्यांनी धार्मिक स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण केले.[३]