गोरखपूर रेल्वे स्थानक
Appearance
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक गोरखपूर जंक्शन हे उत्तर प्रदेशच्या गोरखपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक व भारतीय रेल्वेच्या उत्तर पूर्व रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय आहे. गोरखपूर भारतामधील १०० सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून येथून नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता तसेच देशातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांसाठी थेट गाड्या सुटतात. पूर्व उत्तर प्रदेशातून बिहारकडे जाणाऱ्या बहुतेक सर्व गाड्या येथूनच जातात.
गाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]
- गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस कुशीनगर एक्सप्रेस
- गोरखपूर-वांद्रे टर्मिनस अवध एक्सप्रेस
- गोरखपूर-पुणे एक्सप्रेस
- बिहार संपर्क क्रांती एक्सप्रेस
- सहर्सा-अमृतसर गरीब रथ एक्सप्रेस