घाटंजी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

घाटंजी हे शहर यवतमाळ जिल्ह्यातील एक फार जुने शहर आहे, येथील शेतकरी उच्चकोटीच्या कापसाची शेती करतात म्हणून हे शहर “Cotton City” या नावाने सुद्धा ओळखले जाते. येथे वाघाडी नदीच्या काठावर असलेले ब्राम्हलीन संत श्री मारोती महाराज यांचे देवस्थान आहे. दर वर्षी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात येथील आझाद मैदानावर ब्राम्हलीन संत श्री मारोती महाराज यांच्या नावाने फार मोठ्या यात्रेचे आयोजन करण्यात येते. तसेच या दरम्यान येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून भव्य गुरांच्या बाजाराचे आयोजन देखील करण्यात येते. महाराष्ट्र राज्यासह देशातील विविध ठिकाणांहून येथे गुरांची विक्री व खरेदी करण्यासाठी अनेक लोक येतात. हा विदर्भातील नावाजलेला गुरांचा बाजार आहे. घाटंजी हे शहर “घाटी” व “अंजी” या दोन्ही गावाच्या मध्य स्थीत असल्यामुळे या शहराचे नाव घाटंजी असे पडले आहे. घाटंजी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्याचा एक तालुका आहे. या शहराला लागुणच असलेले गाव- अंजी येथे ऐतिहासिक हेमाडपंथी शैलीतील अत्यंत प्राचीन व भव्य श्री नृसिंहचे पाषाण कलाकृती असलेले मंदिर आहे. महाराष्ट्रातूनच नाही तर आंध्रप्रदेशातूनही लाखो भाविक येथे भगवान नृसिंहाच्या दर्शनासाठी येतात. घाटंजी शहराच्या मध्यवस्तीत सुमारे १५० वर्षांपेक्षाही जुने असलेले अंबादेवीचे जागृत देवस्थान आहे. नवरात्र उत्सवात येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच येथे असलेले संत गजानन महाराजांचे मंदिरही प्रसिद्ध आहे. प्रकट दिनाच्या दिवशी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. एरवीही येथे भाविकांची मांदियाळी असते. घाटंजी या गावात मराठी व ऊरदू भाषेतून नगर पालिका प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आहे तसेच १.श्री समर्थ हायस्कूल व सायन्स ज्यु. कॉंलेज , २.एस. पी. एम. कन्या हायस्कूल ३.एस. पी. एम. मुलांचे हायस्कूल ४.एस. पी. एम. सायन्स व गिलानी आर्ट , कॉंमर्स कॉंलेज हे विद्या मंदिरे प्रामुख्याने आहेत. लगतच्या बेलोरा या गावात “जवाहर नवोदय विद्यालय” हे आहे.

माहिती संकलन- भारत सुविधा (www.BharatSuvidha.com)

साचा:माहितीचौकट भारतीय तालुका


घाटंजी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्याचा एक तालुका आहे.

तालुक्यातील गावे

A. पार्डी नस्करी(अजिंक्य साखरकर )

  1. आमडी
  2. अंजी
  3. बेलोरा (घाटंजी)
  4. भांबोरा
  5. भिमकुंड
  6. बिळायत
  7. बोदाडी
  8. चांदापूर
  9. चिखलवरधा
  10. चिंचोळी (घाटंजी)
  11. चोरांबा
  12. चोरकुंड
  13. दाहेगाव
  14. डांगरगाव
  15. दत्तपूर
  16. देवधारी
  17. धुणकी
  18. डोंगरगाव (घाटंजी)
  19. डोर्ली (घाटंजी)
  20. गणेरी
  21. गावर
  22. घोटी (घाटंजी)
  23. गोविंदपूर (घाटंजी)
  24. हिवरधारा
  25. होनेगाव
  26. इंझाळा
  27. इरूळ
  28. जांब (घाटंजी)
  29. जारंग
  30. जारूर
  31. जुनोणी (घाटंजी)
  32. काळेश्वर (घाटंजी)
  33. कापसी
  34. कारमाणा
  35. कवठा (घाटंजी)
  36. आंबेझरी घाटंजी

कवठा खुर्द खडकी (घाटंजी) खापरी (घाटंजी) खारोणी किन्ही (घाटंजी) कोची (घाटंजी) कोळी बुद्रुक कोळी खुर्द कोंडजाई कोप्रा (घाटंजी) कोपरी (घाटंजी) कुंभारी (घाटंजी) कुरहाड कुरली लाव्हाणा लिंगापूर लिंगी (घाटंजी) माधणी मांडवा (घाटंजी) मांगी मांगीसावरगाव मांगळी बुद्रुक मांजरी मानोळी माणुसधारी मारेगाव (घाटंजी) मारवेली मेजडा मोवाडा मुधाटी (घाटंजी) मुरदगाव मुरळी (घाटंजी) नागेझरी निंबार्डा नुकटी पाडुर्णा बुद्रुक पाडुर्णा खुर्द पांगाडी पारडी (घाटंजी) पारवा (घाटंजी) पाटा पिंपळखुटी बुद्रुक पिंपरी (घाटंजी) राहटी राजेगाव राजुपेठ राजुरवाडी रामपूर (घाटंजी) रासा रत्नापूर सागाडा सायफळ साखरा खुर्द सासणी सावंगी (घाटंजी) सायतखरडा सेवानगर शारद शिरोळी शिवणी सोनखास ताडसावळी तारोडा (घाटंजी) ठाणेगाव तिपेश्वर तिटवी तिवसाळा उंडरणी वाधोणा (घाटंजी) वाघरटाकळी वासरी येडशी (घाटंजी) येरंडगाव येवती (घाटंजी) झारी (घाटंजी) झाटाळा

साचा:विस्तार साचा:यवतमाळ जिल्ह्यातील तालुके