घोडबंदर किल्ला

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट किल्ला घोडबंदर किल्ला हा ठाण्यातील घोडबंदर गावाजवळ उल्हास नदीच्या दक्षिणेस स्थित आहे. हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला, त्यानंतर तो मराठ्यांचा ताब्यात गेला आणि ईस्ट इंडिया कंपनीचे जिल्हा मुख्यालय बनले. या ठिकाणी पोर्तुगीज अरब लोकांसोबत घोड्यांचा व्यापार करीत असे, त्यामुळे या जागेला घोडबंदर हे नाव पडले.

इसवी सन १५३० मध्ये पोर्तुगीज ठाणे येथे आले व त्यांनी इ.स. १५५० च्या आसपास जवळील डोंगराळ भागावर किल्ला बांधायला घेतला, पण सध्या अस्तित्वात असलेल्या किल्ला पूर्णपणे इ.स. १७३० मध्ये बांधून झाला. या किल्ल्याचे पोर्तुगीज नाव - ककाबे दी तन्ना असे होते. इ.स. १७३७ पर्यंत ह्या किल्ल्यावर पोर्तुगीजांचे राज्य होते. तेव्हा त्यांना इथे एक चर्च बांधले आहे, जे अजून अस्तित्वात आहे व त्याचा वापर आज हॉटेल म्हणून करतात. चर्चच्या आतील भिंतींवर दोन पऱ्यांची आकृती कोरली आहे, जी अजून पहावयास मिळते.

मराठ्यांच्या हल्ल्याच्या प्रयत्नांबद्दल अनेक नकाशे व लेख उपलब्ध आहेत. इ.स. १६७२मध्ये शिवाजी महाराज्यांच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यासह, पोर्तुगीज अनेक वर्षांपासून या हल्ल्यांपासून घोडबंदर किल्ल्याचे यशस्वीरित्या रक्षण करू शकले. तथापि, चिमाजी आप्पाच्या अधीन असलेल्या मराठ्यांनी किल्ल्याला यशस्वीरित्या वेढा घातला आणि ११७३७ मध्ये पोर्तुगीजांकडून हा प्रदेश ताब्यात घेतला.

इ.स. १८१८ मध्ये ब्रिटीशांना या किल्ल्यावर ताबा मिळवला व ईस्ट इंडिया कंपनीच्या जिल्हा प्रशासनाचे मुख्यालय बनवले. ज्याचा जिल्हाधिकारी ठाणे येथे असे.

सध्या या किल्ल्याची अवस्था वाईट आहे, पण शासनाचे या किल्ल्याच्या नुतनीकरणाचे काही प्रयत्न चालू आहेत. हा किल्ला भारतीय पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारित येतो.