चंदा कोचर
साचा:माहितीचौकट व्यक्ती चंदा कोचर (१७ नोव्हेंबर, इ.स. १९६१:जोधपूर, राजस्थान, भारत - हयात) या आय.सी.आय.सी.आय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत.[१]
बालपण व शिक्षण संपादन
कोचर यांचा जन्म जोधपूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सेंट ॲंजेला सोफिया स्कूल, जयपूर येथे झाले. नंतर त्या मुंबईला आल्या व मुंबईच्या जयहिंद महाविद्यालयातून कला शाखेतून पदवीधर झाल्यानंतर त्यांनी आय.सी.डब्ल्यू.ए.आय.चा कोर्स पूर्ण केला. कॉस्ट अकाउंटिंग विषयातील प्राविण्यासाठी त्यांना जे.एन. बोस सुवर्ण पदक मिळाले.[२]
कोचर यांनी जमनालाल बजाज व्यवस्थापन संस्थेतून एम.बी.ए.ची पदवी घेतली आहे. व्यवस्थापन शास्त्रात त्यांना वोकहार्ड सुवर्णपदक मिळाले.
व्यावसायिक जीवन संपादन
१९८४ ते १९९३ संपादन
१९८४ साली व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी म्हणून भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ (तेव्हाची आय सी आय सी आय आताची आयसीआयसीआय बँक) येथे रुजू झालेल्या कोचर २००१ मध्ये याच बँकेच्या संचालक म्हणून निवडल्या गेल्या. भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळातील सुरुवातीच्या वर्षांमध्ये त्या कागद, कपडा आणि सिमेंट उद्योगातील प्रकल्प मूल्यमापनाचे काम करीत.
१९९३ ते २००९ संपादन
१९९० च्या दशकात कोचर यांनी आयसीआयसीआय बँक स्थापन करण्यात मोठा भाग घेतला. १९९३ मध्ये ही बँक स्थापन करणाऱ्या अंतरक गटामध्ये कोचर यांची निवड झाली. १९९४ मध्ये सहायक महाव्यवस्थापक आणि १९९६ मध्ये उपमहाव्यवस्थापक म्हणून त्यांची पदोन्नती झाली. १९९६ मध्ये आयसीआयसीआय बँकेच्या उर्जा , दूरसंचार आणि परिवहन अशा पायाभूत उद्योगांची वाढ करणाऱ्या समूहाच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक झाली. १९९८ मध्ये आयसीआयसीआय बँकेच्या २०० प्रमुख ग्राहकांशी संबंध ठेवणाऱ्या मुख्य ग्राहक समूहाची सूत्रे त्यांनी हाती घेतली. २००० साली कोचर यांच्या नेतृत्वाखाली आयसीआयसीआय बँकेने किरकोळ बँकिंग व्यवसायाचे वितरण आणि परिमाण वाढवण्याच्या दृष्टीने नवप्रवर्तन, तंत्रज्ञान आणि प्रक्रियांचे पुनर्गठन सुरू केले. एप्रिल २००१ मध्ये कोचर कार्यकारी संचालक बनल्या.२००६ मध्ये त्यांची उप व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक झाली. २००६-०७ मध्ये त्यांनी बँकेचे आंतरराष्ट्रीय तसेच निगमित व्यवसाय हाताळले.[३]
कोचर यांच्या नेतृत्वाखाली, २०१७१ साली आयसीआयसीआय बँकेने सलग चौथ्या वर्षी भारतातील सर्वोत्तम किरकोळ बँक हा द एशियन बँकर या मासिकाचा किताब पटकावला.[४].
२००९- ते आजपर्यंत संपादन
२००९ मध्ये कोचर यांची आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली.[५]
आयसीआयसीआय समूहाबरोबरच कोचर जपान बिझनेस फोरम च्या तसेच युएस इंडिया सीईओफोरम व्यापार मंडळाच्या सदस्य आहेत. भारतीय बँक संघटनेच्या त्या उपाध्यक्ष आहेत. आय.आय.आय.टी. वडोदरा संचालक मंडळाच्या त्या प्रमुख आहेत .इन्स्टीट्यूट ऑफ इंटरनॅशनल फायनान्स तसेच नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट या संस्थांच्या संचालक मंडळावर आहेत.
भारतीय पंतप्रधानांच्या व्यापार आणि उद्योग मंडळाच्या त्या सदस्य होत्या. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम च्या वार्षिक बैठकीच्या त्या २०११ मध्ये उपाध्यक्ष होत्या.
२०१५ -१६ मध्ये जगातील ३० देशातील सुमारे ७० उद्योगांना एकत्रित आणणाऱ्या इंटरनॅशनल मॉनेटरी कॉन्फरन्स या संस्थेच्या त्या अध्यक्ष होत्या.[६]
कौटुंबिक संपादन
कोचर यांचे वडील रुपचंद अडवाणी हे जयपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य होते.[७] हे कोचर यांच्या वयाच्या तेराव्या वर्षी निधन पावले. त्या नंतर त्यांच्या आईने मुंबई मध्ये बस्तान हलवले.[८] चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर हे वायूउर्जा क्षेत्रातील तज्ञ मानले जातात तसेच हे दोघे व्यवस्थापन प्रशिक्षणातील सहाध्यायी होते.[९].
चंदा कोचर यांची मुलगी आरती हिचा विवाह रिलायन्स समूहात काम करणाऱ्या आदित्य काजी याच्याशी झाला आहे.[१०]
पुरस्कार आणि सन्मान संपादन
२०१७ साली वाॅशिंग्टन येथील वूड्रो विल्सन केंद्राने वैश्विक निगमीय नागरीकतेसाठी चंदा कोचर यांना वूड्रो विल्सन पुरस्कार देऊन सन्मानित केले.[११] या पूर्वी हा पुरस्कार केवळ ए पी जे अब्दुल कलाम आणि इन्फोसिस चे संस्थापक एन.आर. नारायणमूर्ती या दोनच भारतीयांना मिळाला होता.[१२]
२०१७ साली प्रसिद्ध झालेल्या फोर्ब्ज मासिकाच्या आंतरराष्ट्रीय प्रभावशाली महिलांच्या यादी चंदा कोचर यांचा क्रमांक बत्तीसावा होता.[१३]
२०१५ साली प्रसिद्ध झालेल्या टाइम मासिकाच्या १०० जगातील शंभर प्रभावशाली व्यक्तींच्या यादी मध्ये चंदा कोचर यांना स्थान मिळाले होते.[१४]
२०११ मध्ये भारत सरकारने कोचर यांना पद्मभूषण हा नागरी सन्मान दिवा.[१५]
२०११ मध्ये कॅनडा येथील कार्लटन विद्यापीठाने कोचर यांना मानद विद्या वाचस्पती ही पदवी दिली आहे. विद्यापीठाने, श्रीमती कोचर यांनी आर्थिक क्षेत्रात केलेले मूलभूत योगदान, आर्थिक अडचणीच्या काळात दाखवलेले नेतृत्वगुण तसेच व्यावसायिक जीवनात वापरलेल्या तत्वांच्या सन्मानार्थ ही पदवी देऊ केली आहे.[१६]
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत