Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
इन्फोसिस - मराठीपिडिया Jump to content

इन्फोसिस

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट कंपनी

इन्फोसिस टेक्नॉलॉजीज्‌ लिमिटेड (साचा:मुंबई रोखे बाजार, साचा:राष्ट्रीय रोखे बाजार) ही एन्‌.आर. नारायण मूर्ती आणि त्यांच्या सहा सहकाऱ्यांनी पुण्यात १९८१मध्ये स्थापलेली माहिती तंत्रज्ञान सेवा कंपनी आहे. १९८३ साली कंपनीचे मुख्यालय बंगळूर येथे हलवण्यात आले. तिची भारतात नऊ सॉफ्टवेर विकासकेंद्रे असून जगभरात ३० ठिकाणी कार्यालये आहेत. इन्फोसिसचे अदमासे ८८,६०१ कर्मचारी आहेत (डिसेंबर ३१, इ.स. २००७ रोजी). २००६-२००७ सालात कंपनीचे वार्षिक उत्त्पन्न ३.१ अब्ज आणि बाजारमूल्य ३० अब्ज अमेरिकन डॉलरांपेक्षा जास्त होते.

इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

इन्फोसिस टेक्नॉलॉजीज्‌ लिमिटेड एन्‌.आर. नारायण मूर्ती आणि नंदन नीलेकणी, एन.एस. राघवन, क्रिस गोपालकृष्णन, एस.डी. सिबुलाल, के. दिनेश व अशोक अरोरा या त्यांच्या सहा सहकाऱ्यांनी पुण्यात जुलै २ १९८१ मध्ये स्थापन केली. राघवन हे कंपनेचे पहिले कर्मचारी होते. मूर्तींनी त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांच्याकडून १०,००० रुपये उधार घेतले होते आणि तेच कंपनीचे भांडवल उभारण्याकरता वापरले. कंपनीची नोंदणी "इन्फोसिस कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड" या नावाने करण्यात आली होती. राघवन यांचे माटुंगा, उत्तर-मध्य मुंबई येथील घर हे कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय होते. २००१ मध्ये 'बिझनेस टुडे' नियतकालिकाने कंपनीला "भारतातील सर्वोत्कृष्ट नियोक्ता" (नियुक्तकर्ता) किताब दिला होता.

महत्त्वाचे विभाग[संपादन | स्रोत संपादित करा]

इन्फोसिसमध्ये सेवाक्षेत्रांनुसार विभाग करण्यात आले आहेत. त्यांना ’इंडस्ट्रियल इंटिग्रेटेड बिझनेस युनिट’ अशी संज्ञा कंपनीमध्ये वापरली जाते. हे विभाग खालीलप्रमाणे:

  • बँकिंग आणि भांडवली बाजार
  • दूरसंचार माध्यमे आणि मनोरंजन
  • ऊर्जा, युटिलिटीज आणि सेवा
  • विमा, आरोग्यसेवा आणि जैव शास्त्रे
  • उत्पादन
  • रिटेल, ग्राहकोपयोगी उत्पादने आणि पुरवठा यंत्रणा
  • न्यू ग्रोथ इंजिन
  • भारतीय उद्योग
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
इन्फोसिस मुख्यालय, बेंगलुरू.

यांव्यतिरिक्त, येथे स्तरीय विभाग (हॉरिझॉंटल बिसनेस युनिट) आहेत:

  • सल्ला (कन्सल्टिंग)
  • एंटरप्राइझ सोल्यूशन
  • पायाभूत सुविधा व्यवस्थापनसेवा
  • प्रॉडक्ट इंजिनियरिग आणि व्हॅलिडेशन सेवा
  • सिस्टिमस् इंटिग्रेशन

जागतिक कार्यालये[संपादन | स्रोत संपादित करा]

आशिया[संपादन | स्रोत संपादित करा]

उत्तर अमेरिका[संपादन | स्रोत संपादित करा]

युरोप[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी