Jump to content

चंद्रपूर

मराठीपिडिया कडून

साचा:गल्लत साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र साचा:जिल्हा शहर

चंद्रपूर (आधीचे रूढ नाव चांदा) हे चंद्रपूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शहरात शंकराचे (अंकलेश्वर) व महाकालीची प्राचीन मंदीरे आहेत. चंद्रपूर पट्टा खनिजसंपत्तीत समृद्ध आहे. इ.स.२०११ च्या जनगणनेनुसार चंद्रपूरची लोकसंख्या ३,७३,००० इतकी होती आहे. या गावापासून जवळच सुमारे ५ कि.मी. अंतरावर दुर्गापूर येथे औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प आहे.

गोंड राजा खांडक्या बल्लाळशाह ह्याने १३ व्या शतकात चंद्रपूर शहराची स्थापना केली. चंद्रपूर हे त्यावेळेस ह्या गोंड राज्याची राजधानी होती. यास पूर्वी चांदागढ म्हणून नाव होते. त्याला चांदाही म्हणत असत.११ जानेवारी १९६४ रोजी महाराष्ट्र शासन निर्णय क्र> एन.एम.सी./१०६३ हा निर्गमित करण्यात आला होता. त्यानुसार याचे नाव चांदावरून चंद्रपूर असे करण्यात आले.[]

चंद्रपूर आणि आसपासच्या परिसरात उच्च दर्जाचा दगडी कोळसा मुबलक प्रमाणात आहे. म्हणून संपूर्ण भारतात चंद्रपूर Black Gold City (मराठी: काळ्या सोन्याचे शहर) ह्या नावाने ओळखले जाते.

चंद्रपूर शहरालगत सिमेंटचे बरेच कारखाने आहेत. उदाहरणार्थ Larsen and Toubro Limited (L&T) , माणिकगढ सिमेंट. येथे महाकाली अर्थात कालीमातेचे एक प्रसिद्ध देऊळ आहे .

इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

रामाळा तलाव[संपादन | स्रोत संपादित करा]

दुसरी दीक्षाभूमि[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:भाषांतर १९५६ मध्ये डॉ. बी. आर. आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी केलेला ‘दीक्षा’ सोहळा बौद्ध धर्माच्या ऐतिहासिक स्वरूपाचा शहरात १ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे आपल्या कुटुंबातील सदस्यांसह बौद्ध धर्म स्वीकारला. त्यानंतर लवकरच बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील कित्येक भागांतून आलेल्या लाखो अनुयायांचे बौद्ध धर्मात रुपांतर केले. १ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी चंद्रपूर येथे अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. त्यानंतर या जागेला “दीक्षाभूमी” म्हणून ओळखले जाते. दीक्षा म्हणजे अक्षरशः धर्म स्वीकारणे आणि भूमी म्हणजे जमीन. तर अक्षरशः म्हणजे भूमी म्हणजे भूमी म्हणजे लोक बौद्ध धर्मात बदलतात. चंद्रपूर हे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे जन्मस्थान आहे. आंबेडकरांनी केवळ धर्मपूर (बौद्ध धर्म स्वीकार) साठी नागपूर व चंद्रपूरची निवड केली आणि म्हणूनच चंद्रपूरला ऐतिहासिक महत्त्व आहे. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ”दीक्षाभूमीच्या आवारात. बुद्धगया पासून बौद्धवृक्षाची एक शाखा आवारात लावली आहे आणि कृपेने वाढत आहे. या पवित्र ठिकाणी दरवर्षी १ ऑक्टोबरला “धम्म चक्र प्रवर्तन दिन”चे दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित केले जातात. समारंभात हजारो यात्रेकरू आणि भिक्षू दीक्षाभूमीला भेट देतात. दीक्षाभूमी रेल्वे स्टेशन व बसस्थानकापासून अवघ्या १ किमी अंतरावर आहे. वाहन रिक्षा सहज उपलब्ध आहे.

भूगोल[संपादन | स्रोत संपादित करा]

दरवाजे[संपादन | स्रोत संपादित करा]

  • अंचलेश्वर गेट
  • जठपूरा गेट
  • पठाणपुरा गेट
  • बिनबा गेट

खिडक्या[संपादन | स्रोत संपादित करा]

  • चोर खिडकी
  • बगड खिडकी
  • हनुमान खिडकी
  • विठ्ठल खिडकी
  • मसन खिडकी

पेठा[संपादन | स्रोत संपादित करा]

  • भानापेठ
  • बाबूपेठ
  • लालपेठ

उपनगरे[संपादन | स्रोत संपादित करा]

  • तुकुम
  • बापटनगर
  • उर्जानगर
  • शास्त्री नगर
  • रामनगर
  • सरकार नगर
  • रयतवारी
  • बंगाली कॅम्प

वॉर्ड[संपादन | स्रोत संपादित करा]

  • एकोरी
  • अष्टभुजा
  • एकवीरा
  • बालाजी
  • गंज
  • घुटकाळा

कॉलनी[संपादन | स्रोत संपादित करा]

  • सिस्टर

हवामान[संपादन | स्रोत संपादित करा]

तापमान किमान ७.१ ते कमाल ४७.२ से.च्या दरम्यान असते. पर्जन्यमान १३९८ मि.मी इतके आहे. जिल्ह्याचे हवामान एकंदरीत उष्ण असून मुख्यत: दोन ऋतू आहेत उन्हाळा व हिवाळा. उन्हाळा मोठा व कडक असतो तर हिवाळा कमी कालावधीचा पण सौम्य असतो.

जैवविविधता[संपादन | स्रोत संपादित करा]

औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रे[संपादन | स्रोत संपादित करा]

  1. उर्जानगर (CSTPS) - ३४५० मेगावॅट
  2. बल्लारपूर - १००० MW विद्युत निर्मिती क्षमता
  3. दुर्गापूर- ८४० मेगावॅट विद्युत निर्मिती करण्याची क्षमता

प्रशासन[संपादन | स्रोत संपादित करा]

नागरी प्रशासन[संपादन | स्रोत संपादित करा]

  • महानगरपालिका
  • नगरपालिका
  • नगरपंचायत

जिल्हा प्रशासन[संपादन | स्रोत संपादित करा]

  • जिल्हाधिकारी
  • पोलीस अधिक्षक
  • जिल्हा शल्यचिकित्सक
  • मुख्य वनसंरक्षक
  • जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी
  • जिल्हा माहिती अधिकारी
  • जिल्हा आरोग्य अधिकारी

ग्रामीण[संपादन | स्रोत संपादित करा]

  • जिल्हा परिषद
  • पंचायत समिती
  • ग्राम पंचायत

वाहतुक व्यवस्था[संपादन | स्रोत संपादित करा]

  1. एकल मार्ग वाहतूक : जठपुरा गेट ते गांधी चौक

लोकजीवन[संपादन | स्रोत संपादित करा]

गोंडी परंपरा

संस्कृती[संपादन | स्रोत संपादित करा]

रंगभूमी[संपादन | स्रोत संपादित करा]

चित्रपट[संपादन | स्रोत संपादित करा]

खवय्येगिरी[संपादन | स्रोत संपादित करा]

प्रसारमाध्यमे[संपादन | स्रोत संपादित करा]

वृत्तपत्रे[संपादन | स्रोत संपादित करा]

  • दै. महा विदर्भ

वृत्त वाहिन्या[संपादन | स्रोत संपादित करा]

  • सिटी केबल

शिक्षण[संपादन | स्रोत संपादित करा]

चंद्रपूर शहर आपल्या शैक्षणिक सोयी-सुविधांसाठी प्रसिद्ध आहे.

चंद्रपुरात तीन मुख्य पारंपारिक पदवी महाविद्यालये आहेत.

व्यावसायिक महाविद्यालये[संपादन | स्रोत संपादित करा]

चंद्रपूर शहरात नवीनच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) सुरू झाले आहे.

अभियांत्रिकी[संपादन | स्रोत संपादित करा]

शहरातील बाबुपेठ परिसरात सुप्रसिद्ध असे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (GEC) आहे. येथील विद्यार्थ्यांना कॉलेजमधूनच नौकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत, बऱ्याच साॅफ्टवेअर कंपन्या ह्या कॉलेजमध्ये 'कॅम्पस भरती' (Campus Recruitment) साठी येत असतात. त्याचप्रमाणे राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय (RCERT) हे चंद्रपुरातील दुसरे प्रसिद्ध अभियांत्रिकी महाविद्यालय विनाअनुदानीत तत्त्वावर चालवले जाते.

औषधनिर्माण[संपादन | स्रोत संपादित करा]

प्राथमिक व माध्यमिक शिक्षण[संपादन | स्रोत संपादित करा]

कर्मवीर दादासाहेब कन्नमवार उच्च माध्यमिक व कनिष्ट महाविद्यालय ( ज्युबिली हायस्कूल ), लोकमान्य टिळक विद्यालय (LTV), केंद्रीय विद्यालय, विद्या विहार महाविद्यालय, विद्या निकेतन उच्च माध्यमिक व कनिष्ट महाविद्यालय, भवानजी भाई चव्हाण हायस्कूल व कनिष्ट महाविद्यालय, माऊंट कार्मेल महाविद्यालय, जनता महाविद्यालय, महर्षी विद्या मंदिर, लोकमान्य टिळक कन्या विद्यालय (LTKV)

विशेष शैक्षणिक संस्था/महाविद्यालये[संपादन | स्रोत संपादित करा]

वनराजिक महाविद्यालय[संपादन | स्रोत संपादित करा]

येथे वनविभागाचे वन प्रशिक्षण संस्था आहे. यालाच वनविकास व व्यवस्थापन प्रबोधिनी असेही म्हटले जाते. या संस्थेत RFO अर्थात वनक्षेत्रपाल (वन परिक्षेत्र अधिकारी) यांचे प्रशिक्षण होते. ही संस्था मुल रोडवर आहे.

लष्करी शिक्षण संस्था[संपादन | स्रोत संपादित करा]

शहराच्या दक्षिणेकडील टोकाला विसापूरनजिक नवीन सुरू झालेले सैनिक विद्यालय उभारण्यात आले आहे. ही संस्था केंद्र शासनाच्या अधिनस्थ कार्य करते.

खेळ[संपादन | स्रोत संपादित करा]

  • गिर्यारोहण

पर्यटन स्थळे[संपादन | स्रोत संपादित करा]

जतपुरा गेट

चंद्रपूर शहरात व शहराच्या आसपास खालील पर्यटन स्थळे सुप्रसिद्ध आहेत:

महाकाली मंदिर: चंद्रपूर येथील हे महाकालीचे मंदिर राज्यात प्रसिद्ध आहे. चंद्रपूर शहराच्या बस स्थानकापासून पूर्वेस ७ किमी वर हे मंदिर आहे. मंदिरात जाण्यासाठी ऑटो रिक्षा मुबलक प्रमाणात मिळतात. येथे दरवर्षी हिवाळ्यात चैत्र पौर्णिमेला भरणारी महाकालीची यात्रा अतिशय प्रसिद्ध आहे.

ताडोबा: हा भारतातील सुप्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आहे. चंद्रपूरपासून अवघ्या ४० किमी अंतरावर असलेले ताडोबा एक मोठे पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे. विशेष म्हणजे हिवाळ्यात येथे भरपूर विदेशी पर्यटक येत असतात.

आनंदवन:

दीक्षाभूमी, चंद्रपूर:- हे एक प्रसिद्ध बौद्ध तीर्थस्थळ आहे. येथे १६ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ लाख अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यांनी याआधीच्या दोन दिवशी म्हणजेच १४ व १५ ऑक्टोबर रोजी नागपूर मधील दीक्षाभूमी येथे ७ लाख अनुयायांना दीक्षा दिली होती.

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भनोंदी

साचा:महाराष्ट्रातील जिल्हे