चर्नी रोड रेल्वे स्थानक

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:मुंबई उपनगरी रेल्वे पश्चिम मार्ग नकाशा चर्नी रोड हे मुंबई शहराच्या गिरगांव भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर आहे.

इतिहास

या स्थानकाला गिरगांव भागात पूर्वी असलेल्या कुरणांमुळे चरणी रोड अथवा चर्नी रोड असे नाव देण्यात आले. इ.स. १८४८च्या सुमारास तेव्हाच्या ब्रिटिश शासकांनी मुंबईमधील कुरणांमध्ये गुरे चारण्यासाठी मोठे शुल्क आकारणे सुरू केले. हे देण्याची ऐपत नसल्याने गिरगावातील लोकांची गुरे उपाशी मरू लागली होती. त्यावेळी सर जमशेटजी जिजीभॉय यांनी स्वतःचे २०,००० रुपये खर्चून ठाकुरद्वारजवळील समुद्रकिनाऱ्यावरील जमीन विकत घेतली व तेथे गुरांना विनाशुल्क चरण्यास मुभा दिली. या चरणींच्या जवळ असल्यामुळे या इ.स. १८६७मध्ये बांधलेल्या स्थानकाचे नाव चरणी रोड असे ठेवण्यात आले.

जवळचे भाग