चांभारगड

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

चांभारगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

साचा:विस्तार-किल्ला

साचा:महाराष्ट्रातील किल्ले चांभारगड किल्ला १२०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. हा किल्ला रायगड जिल्ह्यातील विस्तिर्ण डोंगररांगेत आहे आणि ट्रेकींगच्या दृष्टीने मध्यम श्रेणीचा आहे.

रायगडाच्या आजूबाजूला असणाऱ्या डोंगररांगावर अनेक किल्ले आहेत. यांत प्रामुख्याने लिंगाणा, काळदुर्ग, सोनगड व चांभारगड यांचा समावेश होतो. यांचा उपयोग केवळ घाटमाथ्यावर नजर ठेवण्यासाठी व टेहेळणीसाठी होत असावा. चांभारगड हा गडापासून हाकेच्या अंतरावर आहे.

किल्ल्यावर हॉटेल्स, खानावळ नसल्याने जेवणाची सोय आपण स्वतः करावी लागते. तसेच किल्ल्यावर पिण्याचे पाणी नसल्याने पाण्याचीही सोय स्वतःलाच करावी लागते.

राहण्यासाठी सोय:

या किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.

कसे जावे :

गडावर जाण्यासाठी महाड गाठावे. महाडा-पोलादपूर हायवे ओलांडून पायथ्याच्या चांभारखेड गावात पोहोवावे. महाड एस.टी. स्थानकापासून येथे जाण्यास २० मिनिटे लागतात. या खिंडीतुन पाऊण तासाच्या चालीनंतर आपण माथ्याच्या कातळकड्यापाशी पोहोचतो. कातळकडा डावीकडे ठेवून थोडे पुढे जावे. नंतर वर जाणारी वाट पकडून १५ मिनिटांत गडमाथा गाठता येतो.

विमान:

रेल्वे :

बस:

जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

गडमाथा म्हणजे एक छोटेसे पठारच आहे. पठारावर थोडेफार घरांचे अवशेष आहेत तर पठाराच्या खालच्या डोंगराच्या पट्टीवर पाण्याची एक दोन टाकी आहेत. या टाक्यांच्या बांधणीवरून हा गड फार पुरातन असावा असा अंदाज बांधता येतो. याखेरीज गडावर पाहण्याजोगे काहीच नाही. अर्ध्या तासात संपूर्ण गडफेरी आटपते.