चारुदत्त आफळे

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

चारुदत्त गोविंद आफळे (जन्म : )हे एक मराठी कीर्तनकार आणि गायक अभिनेते आहेत. ते मराठीतले बी.ए.आणि संगीतातले एम.ए. आहेत

त्यांचे वडील कै. गोविंदस्वामी रामचंद्र आफळे (जन्म : १५ फेब्रुवारी १९१७) आणि इतर पूर्वज हेही कीर्तनकार होते. गोविंदस्वामींची ’आम्ही आहो बायका’, ’तू बायकोना त्याची?’,’प्रतापगडाचा संग्राम’आणि ’बैल गेला झोपा केला’ही चार नाटके रंगभूमीवर आली होती.

चारुदत्तांनी फारशी नाटके लिहिली नसावीत, पण शालेय वयापासूनच ते नाटकांत कामे करीत आले आहेत. ज्या थोड्या संगीत आणि गद्य नाटकांत त्याची कामे गाजली ती नाटके --

  • संगीत आतून कीर्तन वरून तमाशा
  • इथे ओशाळला मृत्यू
  • संगीत कट्यार काळजात घुसली
  • संगीत कान्होपात्रा
  • तो मी नव्हेच
  • संगीत मत्स्यगंधा
  • संगीत मानापमान
  • संगीत लावणी भुलली अभंगाला
  • संगीत विद्याहरण
  • संगीत शाकुंतल
  • संगीत संशयकल्लोळ
  • संगीत सौभद्र

या नाट्यसेवेसाठी चारुदत्त आफळे यांना अनेक सन्मान मिळाले.

मिळालेले पुरस्कार

  • अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून पलुस्कर पुरस्कार
  • गोवा माशेल संघाकडून सुवर्णपदक
  • सन २००३ साली मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
  • सन २००२ मध्ये पुणे की आशा पुरस्कार
  • पुणे मराठी ग्रंथालयाचा पाटणकर पुरस्कार, वगैरे

कीर्तनकार म्हणून कारकीर्द

  • आफळे घराण्याचा मूळ वसा कीर्तन, यातही चारुदत्त आफळेबुवा आघाडीचे कीर्तनकार समजले जातात.
  • १९८८ ते २००८ ह्या वीस वर्षात चारुदत्त आफळे यांनी ३००० च्या वर कीर्तने सादर केली आहेत.
  • त्यांची कीर्तने महाराष्ट्र, गुजरात, बंगाल, कर्नाटक, दिल्ली या अनेक प्रांतांत होत असतात.
  • कीर्तनासाठी ते दोन वेळा अमेरिकेत, एकदा कॅनडात आणि एकदा ऑस्ट्रेलियात जाऊन आले आहेत.
  • दूरदर्शनवर गणेशदर्शन नावाच्या मालिकेत त्यांची कीर्तने झाली आहेत.
  • आता बंद पडलेल्या तारा नावाच्या मराठी दूरदर्शन वाहिनीवर त्यांची महिनाभर प्रवचने झाली होती.
  • ई. टी.व्ही या मराठी दूरचित्रवाणीवर चारुदत्त आफळे यांची मनोबोधावर सतत दोन महिने प्रवचने झाली होती.
  • स्टार माझा या मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर पंढरीच्या वारीच्या निमित्ताने चारुदत्त आफळे यांची कीर्तने सलग महिनाभर होत होती.
  • स्लाइड शोची मदत घेऊन ऐतिहासिक कथा व संतकथा विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय करण्याचे कार्य ते आजही करत आहेत.(२०१४ साली)