Jump to content

चार मुक्ती

मराठीपिडिया कडून

हिंदू किंवा भारतातील प्राचीन समजानुसार मानवाला चार प्रकारच्या मुक्ती मिळू शकतात

साचा:बदल

समीपता[संपादन | स्रोत संपादित करा]

देवाचे सानिध्य प्राप्त होणे.हि मुक्ती उपासना अथवा पुण्याई मुळे मिळते.

पुण्यकाळ त्यांच्या राहिलासे उभा | देवकीच्या गर्भा देव आले || तुकाराम महाराज

सलोकता[संपादन | स्रोत संपादित करा]

देवाचा लोक प्राप्त होणे. विष्णूची उपासना करणाऱ्यांना वैकुंठ,रामाच्या उपासकांना साकेत धाम,कुष्णाच्या उपासकांना गोलोक प्राप्त होतो.हि मुक्ती तपामुळे मिळते

तपाचे सामथ्यर तपिन्नला अमूप| चिरंजीव क्प्ल वैकुंठी नांदे

वैकुंठा जावया तपाचे सायास|करणे लागे नाश जीवा बहु || तुकाराम महाराज

स्वरूपता[संपादन | स्रोत संपादित करा]

देवाचे रूप प्राप्त होणे.हि मुक्ती ध्यानामुळे प्राप्त होते.

ध्यानी ध्याता पंढरीराया|मनासहित पालटे काया || तूकाराम महाराज

सायुज्यता[संपादन | स्रोत संपादित करा]

ब्रम्हरूप होणे. मोक्ष मिळणे.हि मुक्ती ज्ञानाने प्राप्त होते

जे ज्ञान तयाचे हाती|तोची समर्थ मुक्ती|

मात्र या चारहि मुक्ती नामाने मिळतात असे नाही नामापाशी   सतत सेविका म्हणून उभ्या असतात

तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती |एसे बहुता ग्रंथी बोलियले ||

नारायण हरी नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्याचा ||ज्ञान .