चेतन चौहान

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Stub-भारतीय क्रिकेटपटू

चेतन चौहान केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री, श्रीमती स्मृती इराणी यांच्यासह नवी दिल्ली येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT)च्या दीक्षांत समारंभात दीप प्रज्वलित करताना.

साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती

चेतन चौहान (जन्म : बरेली-उत्तर प्रदेश, २१ जुलै १९४७; - १६ ऑगस्ट २०२०) हे एक माजी क्रिकेटर आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री होते.

चेतन चौहान यांचे खरे नाव व पूर्ण नाव चेतेंद्र प्रतापसिंग चौहान होते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चेतन चौहान यांनी एक लढवय्या खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवला होता.

चेतन चौहान यांचे वडील आर्मी ऑफिसमध्ये काम करत असत. त्यांची बदली पुण्याला झाल्याने १९६० मध्ये ते पुण्यास रहाण्यास आले. चेतन चौहान यांचे महविद्यालयीन शिक्षण पुण्यातील वाडिया कॉलजमधून झाले. पुण्यात त्यांना क्रिकेटचे कोचिंग दिले ते महाराष्ट्राचे क्रिकेटपटू कमल भांडारकर यांनी. १९६६-६७ मध्ये चेतन चौहान हे पुणे विद्यापीठासाठी रोहिंग्टन बात्रा ट्रॉफीसाठी क्रिकेट खेळले, आणि त्याच सीझनमध्ये त्यांची निवड वेस्ट झोनसाठी झाली ती विझी ट्रॉफीसाठी. तेथे त्यांनी नॉर्थ झोन विरुद्ध खेळताना त्यानी १०३ धावा केल्या आणि साऊथ झोन विरुद्ध खेळताना त्यांनी ८८ आणि ६३ धावा केल्या. त्या सामन्यात त्याच्याबरोबर सलामीला सुनील गावस्कर होते.

१९६८ मध्ये चेतन चौहान यांनी भारत एकादश संघाकडून क्रिकेटची सुरुवात केली होती. यावेळी आंतरराष्ट्रीय एकादश संघाविरुद्ध खेळताना त्यांनी २ डावात सलामीला फलंदाजी करताना अनुक्रमे ० आणि ३१ धावा केल्या होत्या. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांची कामगिरी जबरदस्त होती. चेतन चौहान यांनी १९७० च्या दशकात सुनील गावसकर यांच्यासह असंख्य कसोटींमध्ये संघाला भक्कम सलामी मिळवून दिली. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ही यशस्वी सलामीवीरांच्या जोडींपैकी एक जोडी आहे. गावसकर यांच्यासोबत सलामीला खेळताना या दोघांनी ३०२२ धावा केल्या. त्यापैकी दहा वेळा त्यांनी शतकी सलामी दिली. त्यांचे आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण २५ सप्टेंबर १९६९ रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवरील भारत विरुद्ध न्यू झीलंड या सामन्याने झाले होते. यावेळी त्यांनी पदार्पणाच्या सामन्यातच न्यू झीलंडचे गोलंदाज ब्रुस टेलर यांच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला होता. तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण ऑक्टोबर १९७८ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान, या सामन्याने केले होते. चेतन चौहान हे १९८१ मध्ये त्यांच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळले. चेतन चौहान यांनी आपल्या कारकिर्दीत २०८४ धावा केल्या. तसेच, त्यांनी सात एकदिवसीय सामनेही खेळले. पण एक ही शतक केले नाही. चेतन चौहान हे कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिले खेळाडू होते. ज्यांनी शतकाशिवाय २००० पेक्षा जास्त धावांचा टप्पा गाठला होता. कसोटीत एकही शतक न करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौहान हे दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांनी ४० कसोटी सामने खेळत २०८४ धावा केल्या होत्या. तर, ऑस्ट्रेलियाचे फलंदाज शेन वॉर्न हे या यादीत अव्वल स्थानी आहे.

१९८० मध्ये त्यांनी ॲडलेड क्रिकेट क्लबमध्ये सहभागी झाले. त्यांनी 'द हिंद' वृत्तपत्रात सांगितले होते की, ते ३ वर्षासाठी क्लबचे कर्णधार आणि प्रशिक्षक होते. ॲडलेडशी त्यांच्या अनेक आठवणी जुळलेल्या आहेत. त्यांनी क्लबमध्ये असताना अनेकदा क्रिकेट खेळले होते. चौहान हे अनेकदा भारतीय संघाचे व्यवस्थापक राहिले आहेत. २००१ मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी कसोटीच्यावेळी त्यांनी संघाचे व्यवस्थापन केले होते. २००७-०८ मध्येही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत ते भारताचे व्यवस्थापक होते. निवृत्तीनंतर १९८५ मध्ये चौहान राजकारणाकडे वळले. ते भारतीय जनता पार्टी पक्षात सामील झाले. १९९० च्या दशकात चेतन चौहान दोन वेळा अलमोरा, उत्तर प्रदेशचे खासदार बनले. निधन होईपर्यंत ते उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री होते.

त्यांचा मृत्यू करोनामुळे झाला.