Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
जनता (वृत्तपत्र) - मराठीपिडिया Jump to content

जनता (वृत्तपत्र)

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
संपादक डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जनता हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले एक वृत्तपत्र होते. या वृत्तपत्राचा पहिला अंक २४ नोव्हेंबर इ.स. १९३० रोजी प्रकाशित झाला. याचे संपादक देवराव विष्णू नाईक होते; त्यानंतर गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे हे जनताचे संपादक झाले. जनता प्रारंभी पाक्षिक होते, ३१ ऑक्टोबर इ.स. १९३० रोजी ते साप्ताहिक झाले.

जनता वृत्तपत्राची बिरुदावली म्हणून ‘गुलामाला तु गुलाम आहेस असे सांगा म्हणजे तो बंड करून उठेल’ हे वाक्य होते. या वृत्तपत्रातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व निकडीचे प्रश्न चर्चिलेत तसेच जनतेतून विशेष म्हणजे त्यांनी विलायतेहून पाठवलेली पत्रे प्रकाशित झाली होती.

इ.स. १९५५ पर्यंत जनता सरू होते. या वृत्तपत्राचे संपादन वेळोवेळी बदलले. कमी त्यात अनियमितपणा निर्माण झाला परंतु तरीही ते खूप दिवस टिकले. ४ फेब्रुवारी इ.स. १९५६ रोजी जनताचे नामकरण प्रबुद्ध भारत असे करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सर्व वृत्तपत्रे मराठी भाषेमध्ये प्रकाशित झालेत कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा होती. कारण बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) महाराष्ट्र होते आणि मराठी तिथली लोकभाषा आहे. सर्वांना ज्ञात आहे की, बाबासाहेब इंग्रजी भाषेचे ही प्रकांड विद्वान होते, परंतु त्यांनी आपली वृत्तपत्रे मराठी भाषेत यामुळे प्रकाशित केली कि त्या वेळी महाराष्ट्रातील दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीत समझू शकत होती. मात्र त्याच वेळी महात्मा गांधी स्वतःला दलितांचे हितचिंतक दाखविण्यासाठी आपले एक वृत्तपत्र ‘हरीजन’ इंग्रजी भाषेत प्रकाशित करत होते. मात्र त्यावेळी दलित जनतेला साधारणपणे इंग्रजी माहिती नव्हती.

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भनोंदी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:कॉमन्स वर्ग

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सृजनात्मक साहित्य (हिंदी)

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर