जमशेदपूर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट शहर

जमशेदपूरचे संस्थापक जमशेदजी टाटा

जमशेदपूर (साचा:Lang-sat) हे भारताच्या झारखंड राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. जमशेदपूर शहर झारखंडच्या आग्नेय भागात पश्चिम बंगालओडिशा राज्यांच्या सीमेजवळ वसले आहे व ते राजधानी रांचीच्या १३०० किमी आग्नेयेस स्थित आहे.ते पूर्व सिंघभूम जिल्ह्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय आहे २०११ साली जमशेदपूरची लोकसंख्या सुमारे १३.४ लाख होती व ते भारतामधील ३५व्या क्रमांकाचे मोठे शहर होते.


१९व्या शतकाच्या अखेरीस प्रसिद्ध भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा ह्यांनी आपल्या नव्या लोखंड उत्पादन कारखान्यासाठी ह्या जागेची निवड केली. १६ फेब्रुवारी १९१२ रोजी येथून पोलादाचे उत्पादन सुरू झाले. १९१९ मध्ये लॉर्ड चेम्सफर्डने ह्या शहराचे नाव जमशेदपूर असे ठेवले. आजही ३ मार्च हा जमशेदजी टाटांचा जन्मदिवस येथे स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो.

वाहतूक

सोनारी विमानतळ शहराच्या वायव्य भागात स्थित आहे परंतु सध्या येथून प्रवासी सेवा कार्यरत नाही. टाटानगर रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व रेल्वे क्षेत्रामधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून येथे दररोज अनेक गाड्या थांबतात.

राष्ट्रीय महामार्ग ३२ जमशेदपूरला दिल्ली-कोलकातादरम्यान धावणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग २ सोबत तर राष्ट्रीय महामार्ग ३३ रांचीसोबत जोडतो.

हेही पहा

बाह्य दुवे