जय भीम

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
भारतीय बौद्ध ध्वजावर ‘जय भीम’

जय भीम हे नवयानी बौद्ध आणि आंबेडकरवादी जनतेद्वारे वापरले जाणारे एक अभिवादन शब्द वा वाक्य आहे. ‘जय भीम’चा अर्थ "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो" असा होय. ‘जय’ म्हणजे ‘विजय’ आणि ‘भीम’ हे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आहे.[१] जय भीम हे अभिवादन हे बौद्ध, दलित, आदिवासी, शोषित, पिडित किंवा मागांस समाजातील लोकांसाठी अस्मितेचे व क्रांतिचे प्रतिक बनलेले आहे. हे अभिवादन आपल्या मूळ अर्थाने धार्मिक स्वरूपाचे नसून याला धार्मिक रूपात कधीही मानले गेले नाही.[२] पण जवळजवळ सर्वच भारतीय बौद्ध हे आंबेडकरवादी असल्यामुळे याला भारतीय बौद्ध अनुयायांचा अभिवादन वा प्रतिक शब्द आता मानला जातो. जय भीम हा शब्द डॉ. आंबेडकर व त्यांच्या विचारांप्रती सन्मानाचे प्रतिक म्हणून ओळखला जातो. हे शब्द स्वाभिमान आणि सन्मानाने अभिवाद वा शुभेच्छा आहेत, जे याचा उच्चार करतात त्यांना प्रोत्साहन मिळते. कोट्यवधी भारतीय व्यक्ती, राष्ट्रीय नेते 'जय भीम'चा नारा देतात.

सुरुवात

जगभरातील आंबेडकरवादी एकमेकांना अभिवादन करण्यासाठी आणि बाबासाहेबांबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी “जय भीम” हा शब्द आदराने व अभिमानाने उच्चारतात. ‘जयभीम’ या प्रेरणादायी शब्दाची सुरुवात बाबासाहेबांचे पक्के अनुयायी असलेल्या एल.एन. हरदास यांनी इ.स. १९३५ मध्ये केली होती. सर्वप्रथम २० डिसेंबर १९३९ पासून स्वतः बाबासाहेब ‘‘जय भीम’’ लिहू लागले आणि अभिवादन म्हणूनही जयभीम वापरू लागले तसेच अभिवादनाच्या उत्तरातही ते जयभीम वापरू लागले. [३][४] जय भीम या अभिवादानाची सुरुवात 'बोले इंडिया जय भीम' या चित्रपटात करण्यात आली आहे. बाबू हरदास यांनी ‘भीम विजय संघा’च्या मदतीने कामगारांना शुभेच्छा दिल्या.[५]

वर्तमान वापर

आज बरेच भारतीय लोक या वाक्यांशाचा वापर आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदरपूर्वक उच्चार व अभिवादन करत आहेत.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

जय भिम म्हणजे काय ? संभाजी भगत

साचा:संदर्भनोंदी

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर