टप्पा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:हा लेख टप्पा हा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील एक गीतप्रकार आहे. हा प्रकार गुलाब नबी मिया शोरी नावाने तयार केला. तानप्रधानता आणि लयप्रधानता ही याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत, हा कलाप्रकार अतिशय अवघड असल्याने तो फारसा प्रचारात नाही.

टप्पागायन करताना मुरक्या, मिंड आणि गमकयुक्त ताना घेतल्या जातात. रागविस्तार कमी प्रमाणात केला जातो. टप्पा हा देस, काफी, खमाज, पिलू, झिंझोटी, भैरवी, गारा इत्यादी रागांनमध्ये गायला जातो. टप्पा गायनाची गती विलंबित किवा मध्य असली तरी टप्प्याचे बोल अत्यंत जलद लयीने गायले जातात. पंजाब प्रांत हे टप्पा गायनाचे निर्माणस्थान असल्याने त्यात पंजाबी भाषेतील शब्द अधिक असतात.