टोनी ताकीतानी
साचा:माहितीचौकट चित्रपट टोनी ताकीतानी (जपानी: トニー滝谷 ;) हा इ.स. २००५ साली पडद्यांवर झलकलेला जपानी भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट हारूकी मुराकामी यांच्या लघुकथेवर आधारला असून जून इचिकावा यांनी दिग्दर्शिला आहे.
कथानक[संपादन | स्रोत संपादित करा]
हा चित्रपट कथानायक टोनी (इस्सेई ओगाता),त्याचे वडील शोझाबुरो ताकीतानी यांच्या भोवती फिरतो.त्यांच्या आयुष्यात स्त्रिया ,मित्र येऊनही एकांतवास अजेय आहे आहे अशी हृदयद्रावक कथा लेखक आणि दिग्दर्शकाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
चित्रपट शैली[संपादन | स्रोत संपादित करा]
जून इचिकावा यांनी छायांकनातून नवीन शैली निर्माण केली आहे. जेव्हा एक दृश्य संपते तेव्हा दुसरे दृश्य सुरू होण्या आधी पुस्तक उलटण्याचा स्पर्श दिग्दर्शकाने दिला आहे. त्यामुळे हारूकी मुराकामी यांच्या मूळ कथेशी चित्रपट एकरूप झाल्याचे जाणवतो.
संगीतमुद्रिका[संपादन | स्रोत संपादित करा]
रुईची सकामोटो यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. संगीत पूर्णपणे पियानोवर देण्यात आले आहे. संगीत रचनाची यादी :
| संगीत रचनेचे नाव | संगीत वेळ |
|---|---|
| १. "DNA - Intro"(डी.एन.ए -सुरुवात) | ११ :३७ |
| २. "Solitude"(सोलीटूद) | ४:५५ |
| 3. "DNA"(डी.एन.ए) | ६:२८ |
| ४. "Bottom" (बोटोम) | ०:४० |
| ५. "Fotografia #1"(फोटोग्राफिया #१ ) | ३:३३ |
| ६. "Fotografia #2"(फोटोग्राफिया #२) | ३:४२ |
| ७. "Solitude #2"(सोलीटूद #२) | २:३४ |
| ८. "Harmonics #1"(हर्मोनिक्स#१) | ०:५१ |
| ९. "Solitude - One Note"(सोलीटूद-वन नोट ) | ३:२५ |
| १०. "Harmonics #2"(हर्मोनिक्स#२ | १:०२ |
| ११. "Solitude - Theme"(सोलीटूद-थीम) | ४:०० |
भूमिका[संपादन | स्रोत संपादित करा]
- इस्सेई ओगाता – ताकीतानी टोनी(मुलगा) ,ताकीतानी शुझाबुरो (वडील)
- री मियाझावा – कोनुमा ऐको ,हिसाको
- ताकाहुमी शिनोहारा – लहानपणीचा टोनी
- हिदेतोशी नोशिजीमा – कथाकथन (आवाज)