डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लेह

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट स्मारक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा २०१६ मध्ये उभारलेला लडाखमधील लेह येथे स्थित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा भारतातील सर्वाधिक उंच स्थानी असलेला पुतळा समजला जातो. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २४ जुलै २०१६ रोजी या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हा पुतळा साडेसात फूट उंचीचा असून नागपूरातून आणण्यात आला आहे. देशी-विदेशी लोकांना डॉ. आंबेडकरांच्या कार्यांची आणि विचारांची माहिती व प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा पुतळा बसवण्यात आला आहे. २१ ऑगस्ट २०१७ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या पुतळ्याला भेट दिलेली आहे.[१][२]

इतिहास

प्राचीन काळापासून बौद्धकालीन परिसर म्हणून लेह-लडाख प्रसिद्ध आहे. येथे पहिल्यांदाच २०१६ च्या २३ ते २५ जुलैदरम्यान "डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय परिषद" आयोजित करण्यात आली होती. आणि आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण २४ जुलै २०१६ रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी तेथे "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सेंटर" स्थापित केले व शिलान्यासही फडणवीस यांच्या हस्ते झाला. हा पुतळा नागपुरात तयार करण्यात आला होता. सनदी अधिकारी असलेले हर्षदीप कांबळे व त्यांच्या पत्नी रोंचाना व्हनिच यांनी हा पुतळा उभारणीसाठी आर्थिक मदत दिली होती. महाबोधी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरतर्फे आंबेडकरांचा हा पुतळा उभारण्यात आला. पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, थायलंडचे भारतातील राजदूत चलित मनित्याकूल, भंते संघसेना महाथेरा, जैन धर्मगुरू लोकेश मुनी यांची मुख्य उपस्थिती होती. या प्रसंगी लडाखचे भंते संघसेना यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे "आधुनिक भारताचे निर्माते" असल्याचे मत मांडले. हा पुतळा साडेसात फूट उंचीचा आहे. पुतळ्याचे प्रतिकात्मक दान भंते संघसेना यांना करण्यात आले. लडाखमध्ये भारतीय आणि विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यांना बाबासाहेबांच्या कार्याची आणि विचारांची प्रेरणा मिळावी, हा उद्देश पुतळा उभारण्यामागे होता. हिमालयीन पर्वतीय भागात उभारण्यात आलेला बाबासाहेबांचा हा पहिलाच पुतळा होय.[३][४]

हे सुद्धा पहा

संदर्भ

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर