डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार

साचा:Infobox award डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे दिला जातो. अनुसूचित जाती व जमाती, भटक्या विमुक्त आणि शारीरिक व मानसिकदृष्टया दुर्बल, वृद्ध, अपंग, कुष्ठरोगी आदींच्या उत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. ₹ १५ हजार, स्मृतीचिन्ह शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.[][][]

इतिहास संपादन

इ.स. २०१६ मध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त राज्यातील १२५ सामाजिक कार्यकर्त्यांना हा पुरस्कार देण्याची योजना आखण्यात आली होती. त्यानुसार इ.स. २०१७ मध्ये हा पुरस्कार राज्यभरातील १२५ स्त्री-पुरुष सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात आला.[][][]

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

साचा:बाबासाहेब आंबेडकर