Jump to content

डोंबिवली रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक डोंबिवली हे डोंबिवली शहरामधील मुख्य रेल्वे स्थानक आहे. येथे मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावरील लोकलगाड्या थांबतात. इ.स. १८८६ साली बांधले गेलेले डोंबिवली स्थानक मुंबई महानगरामधील सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. डोंबिवली शहरामधून मुंबईमध्ये कामकाजासाठी जाणारे बहुतेक सर्व चाकरमानी उपनगरी रेल्वेने प्रवास करतात.