तारपा नृत्य

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
वारली चित्रपट्टीतील तारपा नृत्य

वारली आदिवासी जनजातीचे हे पारंपरिक नृत्य आहे.[१]तारपा हे गारुड्याच्या पुंगीसारखे [२]असणारे वाद्य वाजविणारा वादक जेव्हा आपली लय बदलतो त्यावेळी या नृत्याची लयही बदलते असे या नृत्याचे स्वरूप आहे.[३]


दादरा आणि नगरहवेली प्रांतातील वारली आदिवासींमध्ये हे नृत्य विशेष प्रचलित आहे.[४]

तारपा वाद्य

तारपा हे वाद्य नारनदेव या देवतेने वारली जनजातीला दिले अशी या जनजातीत समजूत प्रचलित आहे.वाळवलेल्या भोपळ्यापासून हे वाद्य तयार करतात.[५]

सादरीकरण

भाद्रपद वद्य द्वादशीच्या आसपास तांदुळाचे नवीन पीक हाती यायला लागल्यावर हे नृत्य सामान्यपणे केले जाते.या नृत्याचा शेतीशी व सुगीच्या आनंदाशी संबंध मानला जातो [६]. सामान्यतः रात्रीच्या जेवणानंतर हे नृत्य केले जाते.यामध्ये मध्यभागी तारपा वादक असून त्याच्याभोवती पुरुष वर्तुळात नाचतात.त्या वर्तुळाच्या बाहेर महिला एकमेकींच्या कमरेत हात घालून आणखी एक वर्तुळ करून नाचतात.[७]







साचा:महाराष्ट्रातील लोककला