तुळशी वृंदावन, पंढरपूर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
तुळशी वृंदावनातील विठ्ठलाची भव्य मूर्ती

साचा:माहितीचौकट इमारत

तुळशी वृंदावन, पंढरपूर हे पंढरपूर येथील प्रेक्षणीय स्थळ आहे. येथे विठ्ठलाची २५ फूट उंचीची मूर्ती आहे. तसेच अनेक फुलझाडे आणि रंगीबेरंगी कारंजे यांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

पंढरपूर येथील यमाई तलावालगत चार कोटी २५ लाख रुपये खर्च करून हे ठिकाण तयार करण्यात आले होते. [१]

निर्मिती

Tulshi Vrundavan 2, Pandharpur, Solapur.jpg

पंढरपूरातील यमाई तलावाच्या परिसरात वनविभागाच्या वतीने तुळशी वृंदावनाची उभारणी करण्यात आली. विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आपला काही वेळ शांतपणे आणि निसर्गाच्या सान्निध्यात घालवता यावा, त्याचबरोबर विविध संतांच्या चरित्राविषयी माहिती मिळावी या हेतूने राज्य सरकारने तुळशी वृंदावनाची निर्मिती केली.[२] त्यासाठी चार कोटी २५ लाख रुपये खर्च करण्यात आला.

इतर माहिती

येथील वृंदावनामध्ये विविध प्रकारच्या तुळशीबरोबरच इतर अनेक फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे. रंगीबेरंगी कारंजे आणि भव्यदिव्य अशा विठ्ठल मूर्ती पाहण्यासाठी अनेक भाविक येथे येतात.[१]

सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत पर्यटकांना वृंदावनात प्रवेश देण्यात येतो. लहान मुलांसाठी १५ रूपये प्रवेश शुल्क तर मोठ्यांसाठी २० रुपये शुल्क आकारण्यात येतात.

वैशिष्ट्ये

  • विठ्ठलाची २५ फूट उंचीची मूर्ती
  • विविध संतांच्या संतकुटी
  • संतांच्या जीवनावर आधारित भित्तीचित्रे
  • रंगीबेरंगी फुले
  • विविध प्रकारची तुळशी
  • कारंजे
  • ॲम्फी थिएटर  

बाह्य दुवे

  • [१] युट्यूब १
  • [२] युट्यूब २

संदर्भ