त्यागराज

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट संगीतकार


त्यागराज (४ मे १७६७–६ जानेवारी १८४७). हा कर्नाटक संगीतातील श्रेष्ठ रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ, वीणावादक व गायक होता. त्यागराज, मुथ्थुस्वामी दीक्षितर आणि श्यामशास्त्री या प्रख्यात त्रिमूर्तींपैकी तो पहिला म्हणून ओळखले जातो. त्याचा जन्म तंजावर जिल्ह्यातील तिरुवारूर येथे झाला. तो रामभक्त आणि साधुवृत्तीचे श्रेष्ठ महापुरुष होता.

वयाच्या अठराव्या वर्षी त्याचा विवाह झाला. तेलुगू व संस्कृत भाषांचे त्याला उत्तम ज्ञान होते. लहानपणी तो घराच्या भिंतीवर आपल्या गीतरचना लिहून ठेवी. गुरू सोंटी वेंकटरमणय्या याकडे त्याचे संगीताचे शिक्षण एका वर्षातच पूर्ण झाले. उंछवृत्तीने तो कापणी झालेल्या शेतांमधून पडलेले धान्याचे दाणे गोळा करून तो स्वतःचा, मोठ्या शिष्यशाखेचा आणि अतिथींचा चरितार्थ चालवीत असे. साचा:विस्तार