दलाई लामा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विकिडेटा माहितीचौकट साचा:गल्लत

विद्यमान दलाई लामा

दलाई लामा हे तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते असतात. ‘दलाई लामा’ याचा अर्थ ‘ज्ञानाचा महासागर’ असा होतो. जगभरातील बौद्ध यांना आपले धर्मगुरू मानतात. आतापर्यंत १३ दलाई लामा होऊन गेले असून सध्याचे चौदावे दलाई लामा हे तेन्झिन ग्यात्सो आहेत. चीनने तिबेट देशावर केलेल्या विरोधामुळे त्यांना भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील धरमशाला येथे आश्रय घेतला आहे.

इतिहास

तिबेटमध्ये दलाई लामांची परंपरा चौदाव्या शतकापासून सुरू झाली. ‘दलाई’ म्हणजे महासागर व ‘लामा’ म्हणजे ज्ञान, दलाई लामा या संयुक्त शब्दाचा अर्थ ज्ञानाचा महासागर असा आहे. हे लामा बुद्धिष्ट गुरू किंवा शिक्षक असतात. पहिले लामा जेनडून द्रूप हे ड्रेपुंग विहाराचे उच्च लामा झाले. ‘ड्रेपुंग’ हा तिबेटमधील सर्वात भव्य विहार आहे. पहिल्या लामांनंतर प्रत्येक नवा दलाई लामा हा पूर्वीच्या लामाचा अवतार मानला जाऊ लागला. सध्या दलाई लामा हे तिबेटीय लोकांचे सर्वोच्च धार्मिक नेते व शासन प्रमुख देखील आहेत. इ.स. १३९१ ते इ.स. १९३३ या कालखंडात तेरा दलाई लामा होऊन गेले. तिबेटीय परंपरेनुसार ज्येष्ठ धर्मगुरू व शासन मिळून नवीन दलाई लामा निवडीची जबाबदारी पार पाडतात.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

चीनचा नवा खोडसाळपणा

साचा:दलाई लामा