दलित व्हॉइस

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विकिडेटा माहितीचौकट दलित व्हाईस (मराठी: दलित आवाज) हे भारतातील बंगलोर येथून प्रकाशित होणारे इंग्रजी राजकीय नियतकालिक होते. सध्याचे ह्या नियतकालिकाचे नंतरचे पूर्ण नाव "दलित व्हाईस : द व्हाईस ऑफ पर्सिक्यूटेड नॅशनॅलिटीज डिनाईड ह्यूमन राईट्स" असे होते. हे दर पंधरवड्याला आंतरजालावर आणि छापील स्वरूपातही प्रकाशित होत असे. १९८१ साली याची स्थापना व्ही.टी. राजशेखर यांनी केली होती,[१] हे एके काळी सर्वात जास्त खपाचे दलित नियतकालिक होते.[२] हे नियतकालिक आणि त्याचे संकेतस्थळ २०११ साली बंद करण्यात आले.[३]

भूमिका

कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयाने या मासिकाचे खालीलप्रमाणे वर्णन केले आहे,

"ह्याचे चारित्र्यच मुळात ब्राम्हणवाद-विरोधी, जातिवाद-विरोधी आणि वर्णद्वेष विरोधी भूमिका असलेले आहे, ह्यांतून ब्राह्मणवादापासून मुक्तीचा पुरस्कार केला जातो. हे स्वतःला "भारतातील सर्व वंचितांचे, मानव्याचे हनन झालेल्या सर्वांचा प्रवक्ता मानते", — दलित, मागास जाती, ख्रिस्ती, मुसलमान, शीख, महिला — "सर्व आर्य ब्राह्मणवादाच्या वळी ठरलेल्यांचे"[४]

या मासिकामधील प्रकाशित लेखांमधून हिंदू धर्म, झियोनिझम, यहुदी धर्म, साम्यवाद आणि अमेरिकन नव-प्रतिगामित्ववाद (American neoconservatism) यांच्यावर हल्ला केला गेला.[५][६][७][८][९]

लोकांकडून स्वीकार

हे सुद्धा पहा

संदर्भ

साचा:संदर्भयादी

  1. साचा:संकेतस्थळ स्रोत
  2. साचा:संकेतस्थळ स्रोत
  3. साचा:संकेतस्थळ स्रोत
  4. Columbia University Library entry for Dalit Voice
  5. K. Jamanadas, "Is it possible to destroy Hindutva without harming Hinduism?"
  6. Iqbal Ahmed Shariff, "Hitler not worst villain of 20th century as painted by zionists", Dalit Voice 16–30 June 2005 साचा:संकेतस्थळ स्रोत
  7. Iqbal Ahmed Shariff, "A Reply to Critics of D.V. Article on Hitler: Jews & the "Jews of India", Dalit Voice, vol.25, No.1 undated
  8. "D.V. and Foreign Affairs", Dalit Voice, vol.25, No.1 undated
  9. Dalit Voice - The Voice of the Persecuted Nationalities Denied Human Rights साचा:Webarchive