दलित हिस्ट्री मंथ

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

दलित हिस्ट्री मंथ (दलित इतिहास महिना) दलित किंवा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील महत्त्वाचे लोक आणि घटना लक्षात घेऊन साजरा केला जाणारा एक वार्षिक कार्यक्रम आहे.[१][२] बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी हे एप्रिलमध्ये जगभर साजरे केले.[३][४] या महिन्यात चर्चा,[५] कथाकथन,[६] इतिहास प्रकल्प,[७] माध्यमातील विशेष प्रकाशने,[८] आणि कलाकृती[९] इ. आयोजित केल्या जातात.[१०][११]

इतिहास

ब्लॅक हिस्ट्री मंथ यापासून प्रेरित होऊन दलित महिलांच्या एका गटाने २०१३ मध्ये दलित हिस्ट्री मंथ सुरू केला.[१२] संघपाली अरुणा यांनी दलित, आदिवासी आणि बहुजन इतिहास आणि संस्कृती यांचे संकलन करण्यासाठी दलित हिस्ट्री मंथ प्रकल्प सुरू केला.[१३][१४] शिकागो येथे कलर ऑफ व्हॉईलंस परिषदेत झालेल्या चर्चेच्या वेळी संघपाली अरुणा आणि थेंमोझी सौंदराराजन यांनी कल्पना मांडली.[१५][१६]

महत्त्व

भारतात बेकायदेशीर असूनही दलितांसोबत त्यांच्या जातीमुळे भेदभाव केला जातो.[१७][१८][१९] दलित इतिहास महिन्यात मुख्य प्रवाहातील लेखकांद्वारे भारतीय इतिहासात दलितांचे दुर्लक्ष आणि अनुपस्थिती यावर चर्चा केली जाते.[२०] दलित जनतेच्या प्रश्नांवर नागरिक विचार करतात.[२१]

चित्रदालन

हे सुद्धा पहा

तळटीप

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे