दिलशाद खान

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

दिलशाद खान (मूळ नाव अरविंद दासगुप्ता; १९ मे, इ.स. १९४५:कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत - ) हे एक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक आहेत.

दिलशाद खान यांची आई भवानी दासगुप्ता या ऑर्गन वाजवून गाणे गायच्या तर वडील प्रफुल्लकुमार दासगुप्ता हे आजच्या बांगलादेशात असणाऱ्या खुलना जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट होते. ते कोलकात्यातील झंकार आर्ट सर्कल मध्ये भाग घेत अशतील. खान यांचे आजोबा बुद्धदेव दासगुप्ता हे सरोदवादक होते.

झंकार आर्ट सर्कलमुळे दिलशाद खान यांची सलामतअली खॉं, विलायत खॉं, आमीर खॉं, बडे गुलाम अली खॉं, पं. राधिका मोहन मित्रा, पं. ग्यानप्रकाश, पं. रविशंकर अशा अनेक संगीतज्ञांची ओळख झाली.