दीपमाळ

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

दीपमाळ ही मंदिराच्या प्रांगणात रात्री प्रकाशासाठी केलेले एक प्रकारचे स्तंभसदृष्य बांधकाम असते. हे बांधकाम बहुदा दगड व चुन्याचा वापर करून केलेले असते.खाली चौथरा, त्यावर गोलाकार स्तंभ असून तो पायऱ्या-पायऱ्यांनी वर निमुळता होत गेलेला असतो. पायऱ्यावर तेलाचे दिवे ठेवण्यासाठी खड्डे असतात. सर्वात वर खोलगट भाग असून त्या भागात ऊद, गुग्गुळ असे ज्वालाग्राही पदार्थ टाकून पेटवितात. त्यामुळे उंचावरून प्रकाश दूरवर पसरतो.मराठवाड्यात ग्रामीण भागात दीपमाळला डीकमळ असे म्हणतात.

चित्र:ज्योतिबा मंदिर यात्रा.jpg
मंदिरासमोर असलेल्या काळ्या दगडाच्या दीपमाळा
ओंमकारेश्वर मंदिर, पुणे येथील दीपमाळ

साचा:विस्तार