दुर्गादेवीचा दुष्काळ

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

दख्खनेत इ.स. १३९६-१४०७ अशा सलग बारा वर्षांमध्ये पडलेला दुष्काळ दुर्गादेवीचा दुष्काळ या नावाने ओळखला जातो[१]. या दुष्काळात महाराष्ट्र, कर्नाटक या दख्खनेतल्या प्रदेशांत राहणारे कित्येक लोक उपासमारीमुळे मेले, तर कित्येक अन्नान्नदशेमुळे स्थलांतरित झाले.

मदतकार्याचे उल्लेख

दुर्गादेवीच्या दुष्काळात बहामनी राज्यातील शिराळशेठ (किंवा श्रीयाळ श्रेष्ठी) नावाच्या एका व्यापाऱ्याने दुष्काळग्रस्तांसाठी बहुमोल काम केले साचा:संदर्भ हवा. उदार मदतकार्यामुळे शिराळशेठ आणि त्याच्या औदार्याची कीर्ती उत्तरकाळात आख्यायिकांच्या रूपाने व श्रावण शुद्ध षष्ठीस दरवर्षी साजऱ्या केल्या जाणाऱ्या श्रीयाळ षष्ठीच्या रूपात जनममानसात ठसली.

संदर्भ व नोंदी

साचा:संदर्भयादी


साचा:विस्तार