दूर्वा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
दूर्वा

दूर्वा ही औषधी वनस्पती आहे.[१] या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Cynadon dactylon असे असून त्याचे कुळ Poaceae किंवा Gramineae हे आहे.[२]ही वनस्पती वर्षभर उपलब्ध असते. पावसाळ्यात हीई मोठ्या प्रमाणावर उगवते. सप्टेंबर-ऑक्टोबर तसेच फेब्रुवारी-मार्च या महिन्यात या वनस्पतीला फुले येतात.[३]

औषधी गुणधर्म

  • दूर्वा ही शीतल गुणधर्माची वनस्पती आहे.[४]
  • उष्णतेमुळे नाकातून रक्त आल्यास नाकात दुर्वांचा रस पिळला जातो.[५]
  • त्वचेचे तेज वाढण्यासाठी दुर्वा वाटून लेप चेह-याला लावला जातो.
  • मूत्र विकारांवर दूर्वारस उपयुक्त ठरतो.
  • रक्तशुद्धीसाठी दूर्वारस पोटात घेतला जातो.[६]

धार्मिक महत्त्व

दूर्वा वाहून पूजा केलेला गणपती

हिंदू धर्मात या वनस्पतीला धार्मिक विधींमध्ये विशेष महत्त्वाचे स्थान आहे.[३] गणपतीच्या पूजेत हिचा वापर करतात,[७] कारण या गणपतीला प्रिय आहेत असे मानले जाते.[८] दुर्वा वनस्पतीचा विवाह वडाच्या झाडाशी करण्याची परंपरा हिंदू जीवनशैलीत आहे.[९][१०]

संदर्भ