दो दूनी चार

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विकिडेटा माहितीचौकट दो दूनी चार हा २०१० सालचा हिंदी कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे जो अरिंदम चौधरी (प्लॅनमन मोशन पिक्चर्स) निर्मित आणि हबीब फैसल दिग्दर्शित व लिखीत आहे. यात ऋषी कपूर, नीतू सिंग, आदिती वासुदेव आणि आर्चीत कृष्णायांनी अभिनय केला असून मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट एका मध्यमवर्गीय शाळेतील शिक्षकाविषयी आहे जो महागाईच्या काळात पत्नी आणि मुलांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि कार खरेदी करण्याच्या स्वप्नांमध्ये रमतो. त्याच्या याच एका कारच्या खरेदी भोवतीची ही कथा आहे. वाढत्या महागाईत आणि त्यांच्या कुटुंबाच्या मागण्या पूरविण्याच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट आहे ज्यात कमी वेतन असलेल्या मध्यमवर्गीय शालेय शिक्षकांच्या समस्यांचा मुद्दा उभारला आहे. या सिनेमात ऋषी कपूर आणि नीतू सिंग या कपूर दांप्ताने रुपेरी पडद्यावर मुख्य जोडी म्हणून पुनरागमन केले. या जोडीने ३० वर्षांमध्ये चित्रपटात भूमिका केली नसली तरी त्यांनी यापूर्वी १९७० च्या दशकात अनेक हिट चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. दिग्दर्शकीय पदार्पण करणारा चित्रपट डिस्ने वर्ल्ड सिनेमाद्वारे वितरित केलेला पहिला गैर-ॲनिमेटेड हिंदी चित्रपट देखील होता. ५८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटाने हिंदीतील सर्वोत्कृष्ट पुरस्कार जिंकला.[१][२][३][४]

निर्माण

चित्रपटाच्या कथालेखनाच्या वेळी देखिल ऋषी कपूर निर्मात्यांच्या मनात होते. ऋषी कपूरच्या विरुद्ध महिला कलाकारासाठी सुरुवातीला जूही चावलाकडे संपर्क साधला गेला होता, तथापि, तिने ही भूमिका नाकारली.[५] नीतू-ऋषीच्या जोडीने सैफ अली खान आणि दीपिका पादुकोणच्या २००९ सालच्या लव आज कल या सिनेमातून थोडक्यात हजेरी लावली असली तरी, दो दूनी चार हा या जोडीचा ३० वर्षानंतरचा पहिला चित्रपट होता. १९७९ मध्ये ऋषी कपूरसोबत तिच्या विवाहानंतर नीतू सिंग यांनी चित्रपटातून निवृत्ती घेतली होती. एका मुलाखतीत नीतूने हा खुलासा केला की तिचा या चित्रपटात काम करण्याचा कोणताही हेतू नव्हता; पण तिच्या पतीच्या आग्रहास्तव तिने संहिता ऐकण्याची तयारी दर्शविली आणि मग होकार पण दिला.[६]

किरोरी माल कॉलेज, विनोबापुरी, शालीमार बाग, खान मार्केट, चित्तरंजन पार्क, मयूर विहार फेज ३ आणि नोएडा यासारख्या दिल्लीतील ठिकाणांवर चित्रीकरण झाले आहे.[७]

मीत ब्रदर्सने या चित्रपटाचे संगीत देले असून शंकर महादेवन, विशाल ददलानी, सुनिधी चौहान यांनी गाणी गायली आहेत.

पुरस्कार

५८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटाला हिंदीतील सर्वोत्कृष्ट पुरस्कार बहाल करण्यात आला.[८] तसेच, त्यास चार फिल्मफेअर पुरस्कार[९] आणि एक स्टार स्क्रीन पुरस्कारही मिळाले.[१०]

संदर्भ

साचा:संदर्भयादी साचा:राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट