नंदनार

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

नंदनार (तमिळःநந்தனார் or திருநாளைப் போவார் நாயனார்:तिरुनाळैप् पोवार् नायनार ) तमिळनाडुत जन्मलेले शिव संप्रदायातील संत नंदनार नावाने ओळखले जातात.तसेच ते 'तिरुनालाप्पोवर (तिरुनालाइप्पोवार)' आणि 'तिरु नालाई पोवार नयनार' या नावानेही ओळखले जातात.ते एक असे संत होते जे, शिव संप्रदायातील आहेत व शिवाचे अनन्य भक्त होते.सर्व नयनारांमध्ये ते एकमेव दलित ("अस्पृश्य") संत आहेत.साधारणतः ६३ नयनारांच्या यादीत त्यांचे स्थान अठरावे आहे.

तमिळ समाजातील लोक कथा, लोक संगीत, नाटके, चित्रपट आणि साहित्यात नंदनाराच्या कथेची अनेकदा पुनरावृत्ती झाली आहे.८व्या शतकापासून नयनार यादीमध्ये नंदनारांचा समावेश आहे, १२ व्या शतकात सी.पी. पेरिया पुराणम यांनी त्यांच्या संतचरित्रात त्यांचे जीवनाची संपूर्ण माहिती दिली आहे.ती कथा त्यांच्या दोन चमत्कारांवर लक्ष केंद्रित करते.शिवलोकनाथ मंदिर, तिरुपंकुर येथे; त्यांच्या प्रार्थनेने एक विशाल दगडांचा बैल हालल्या गेला, जो तेथे अजूनही त्याच स्थितीत दिसतो.

साचा:विस्तार

साचा:हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय