नंदी
Appearance

नन्दी अथवा नन्दीश्वर हे स्वायंभू मन्वंतरातील कामधेनुचे पुत्र होत. हे शिवगणांतील शंकराचे वाहन होत. ह्यांची आकृती मनुष्यासारिखी, मुख वानरासारिखे आणि भुज र्हस्व असतांत. दक्षविध्वंसनासमयी ह्यांनी भगनामक ऋत्विजास बांधिले. ह्यांनी दक्ष तसेच रावणासही शाप दिला होता. नन्दीपुराण नामे एक स्वतंत्र पुराण असून, सत्यनन्दी नामे एक व्रत आहे. लिंगायत मतानुसार बसवराज हे नन्दीअवतार मानले जातात. शिव मंदिरात शंकराच्या पींडीसमोर नन्दी अशी रचना केलेली आढळते.
अपवाद[संपादन | स्रोत संपादित करा]
नाशिक येथील कपालेश्वर मंदिर - हे एक् नंदी नसलेले शिवमंदिर आहे. साचा:विस्तार