Jump to content

नागपूर मेट्रो टप्पा २

मराठीपिडिया कडून

साचा:मुख्य लेख

नागपूर मेट्रो टप्पा २ हा प्रकल्प नागपूर मेट्रोचा विस्तार करण्याचा प्रकल्प आहे. नागपूर मेट्रोच्या बांधण्यात येणाऱ्या सध्याच्या मार्गिकांची लांबी याद्वारे वाढविण्यात येणार आहे. नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच याचे काम सुरू करण्यात येईल.[]

महामेट्रोने याबबतचा आपला प्रकल्प अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर केला होता.राईट्स या रेल्वेच्या कंपनीने हा अहवाल तयार केला होता.सन २०१८ चे दरपत्रक लक्षात घेता, याचा खर्च सुमारे १०,५०० करोड रुपये इतका आहे.यात ३५ स्थानकांसह ५ विस्तारीत मार्ग आहेत. या सर्वांची एकत्रित लांबी सुमारे ४८.३ किमी इतकी राहील.[][]सन २०२४ पर्यंत या दुसऱ्या टप्प्यातून २.९ लाख प्रवासी प्रवास करतील असे अंदाजित आहे.[]

महाराष्ट्र राज्याच्या नागरी विकास खात्याने या वर नमूद प्रस्तावास मंजूरी दिली आहे.[] हा प्रस्ताव ११,२१६ कोटींचा असून,[]हा प्रस्ताव दिनांक ८ जानेवारी रोजी होणाऱ्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठेवला जाईल व त्यास मंजूरीनंतर तो केंद्रीय मंत्रीमंडळाच्या मंजूरीसाठी पाठविण्यात येणार आहे.[]

या प्रस्तावास महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळाने दि. ०८-०१-२०१९ला मंजूरी दिली आहे.[];[]

या एकूण खर्चापैकी ६०% रक्कम ही महामेट्रोद्वारे कर्जामार्फत उभारण्यात येणार आहे. तर राज्य व केंद्र सरकार यापैकी प्रत्येकी २०% रक्कम देईल.[]

या कामास सुमारे ४ वर्षे लागतील असा अंदाज आहे.[]

हेही बघा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी