नारायण ज्ञानदेव पाटील

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

नारायण ज्ञानदेव पाटील (१५ जुलै १९२९- १७ जानेवारी २०२२) हे महाराष्ट्रातील राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक होते. एन. डी. पाटील या नावाने ते ओळखले जातात. शेतकरी कामगार पक्षाचे ते नेते होते.[१]

आपाटील यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूररयत शिक्षण संस्थेमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांचे काम पाहिले होते. ते महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे १८ वर्षे सदस्य होते. १९७८ ते १९८० या काळात ते राज्याचे सहकार मंत्री होते.[२] ते १९८५-९० दरम्यान महाराष्ट्र विधानसभेत कोल्हापूरचे आमदार होते. तसेच १९९९-२००२ या काळात त्यांनी लोकशाही आघाडी सरकारचे निमंत्रक म्हणून काम केले.[३]

१७ जानेवारी २०२२ रोजी कोल्हापूरात वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकळाने त्यांचे निधन झाले.[१]

संदर्भ