निवृत्तीबुवा सरनाईक

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार साचा:माहितीचौकट गायक

पंडित निवृत्तीबुवा सरनाईक (जुलै ४, इ.स. १९१२ - फेब्रुवारी १६,इ.स. १९९४) हे हिंदुस्तानी संगीतशैलीतील जयपूर-अत्रौली घराण्याचे मराठी गायक होते.

पूर्वायुष्य

निवृत्तीबुवांनी संगीताचे प्रारंभिक शिक्षण गोविंद विठ्ठल भावे व आपले काका शंकरराव सरनाईक यांचेकडून घेतले. त्यानंतरचे सांगीतिक शिक्षण त्यांनी रजब अली खान व सवाई गंधर्व यांचेकडे घेतले. त्यांच्या गायकीवर सर्वाधिक प्रभाव त्यांचे संगीत गुरू व जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक अल्लादिया खान साहेब यांचा होता. पुढे त्यांनी त्याच शैलीत आपले गायन विकसित केले.

सांगीतिक कारकीर्द

बुवांनी आपल्या कसदार गायनाने अनेक मैफिली गाजवल्या व अनेक मानाचे समजले जाणारे पुरस्कार प्राप्त केले. ते कोल्हापूर संस्थानाचे दरबार-गायक होते. इ.स. १९७० चे दरम्यान ते मुंबई विद्यापीठात संगीत प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. इ.स. १९७८ मध्ये त्यांनी कोलकाता येथील आय. टी. सी. संगीत संशोधन अकादमीत निवासी संगीत गुरू म्हणून काम बघण्यास सुरुवात केली.

इ.स. १९९३ मध्ये त्यांची तब्येत खालावल्याने ते मुंबईस परतले. १६ फेब्रुवारी, इ.स. १९९४ रोजी त्यांचे निधन झाले.

पुरस्कार व सन्मान

  • संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल इ. स.इ.स. १९८० मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले.
  • मध्य प्रदेश शासनाचा मानाचा पुरस्कार " तानसेन सन्मान" सन १९८६ (मुख्यमंत्री मोतीलाल वोरा यांचे हस्ते)
  • महाराष्ट्र गौरव पुरस्कार - सन १९९० (मुख्यमंत्री शरद पवार यांचे हस्ते)
  • बनारस विश्व हिंदू विद्यापीठातर्फे मानपत्र व जाहीर सत्कार - सन १९८८

बाह्य दुवे

साचा:हिंदुस्तानी संगीत