न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२१-२२

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox cricket tour न्यू झीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर - डिसेंबर २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळवली गेली. सप्टेंबर २०२१ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दौऱ्याचे वेळापत्रक जारी केले.

नोव्हेंबरमध्ये झालेल्या २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकनंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी पदत्याग केला. त्यांच्याजागी राहुल द्रविड यांची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली. तसेच विश्वचषकानंतर विराट कोहलीने भारताच्या ट्वेंटी२० संघाच्या कर्णधारपदावरून राजीनामा दिला. त्यामुळे उपकर्णधार रोहित शर्माला भारताच्या ट्वेंटी२० संघाच्या कर्णधारपदी कायमस्वरुपी नियुक्ती करण्यात आली. तर पहिल्या कसोटी सामन्यासाठी अजिंक्य रहाणेला कर्णधार केले गेले. विराट कोहली विश्रांती घेऊन झाल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताचे कर्णधारपद सांभाळेल असे बीसीसीआयतर्फे जाहीर केले गेले. ट्वेंटी२० मालिकेपूर्वी कसोटी मालिकेच्या लक्ष देण्यासाठी केन विल्यमसनने ट्वेंटी२० सामने न खेळण्याचे ठरवले. त्यामुळे टिम साउदीला ट्वेंटी२० मालिकेसाठी न्यू झीलंडचा कर्णधार केले गेले.

भारताने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका ३-० अश्या फरकाने जिंकली. न्यू झीलंडला मायभूमीवर भारताने ट्वेंटी२० मालिकेत पहिल्यांदाच व्हाइटवॉश केले. पहिल्या कसोटीत पाचव्या दिवसअखेरीस भारताला विजयासाठी एक गडी पाहिजे असताना खराब प्रकाशामुळे सामना अनिर्णित ठेवावा लागला. ही कसोटी अनिर्णित सुटल्यामुळे न्यू झीलंडने सर्वाधीक सलग १० कसोटी सामन्यांमध्ये अपराजीत राहण्याचा विक्रम केला. केन विल्यमसन दुखापतग्रस्त झाल्याने दुसऱ्या कसोटीत टॉम लॅथमने न्यू झीलंडचे नेतृत्व केले. १८८८-८९ नंतर ही पहिलीच अशी वेळ होती जेव्हा दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत चार खेळाडूंनी दोन्ही संघांचे कर्णधारपद भूषविले होते. दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात न्यू झीलंडच्या एजाज पटेलने सर्वच्या सर्व १० बळी मिळवले. एकाच डावात सर्व १० बळी मिळवणारा एजाज हा जगातला तिसरा तर न्यू झीलंडचा पहिला खेळाडू ठरला. यापूर्वी इंग्लंडच्या जिम लेकर आणि भारताच्या अनिल कुंबळे या दोघांनी अशी कामगिरी केली होती. भारताने दुसऱ्या कसोटीत ३७२ धावांनी विजय मिळवत कसोटी मालिका १-० ने जिंकली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

३रा सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका

१ली कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

२री कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने साचा:न्यू झीलंड क्रिकेट संघाचे भारत दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२१-२२ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे