पंचमढी (हिंदीत पचमढी) हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील हुशंगाबाद जिल्ह्यातील एक पर्वतावरील थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणाहूनच गुप्त महादेव, छोटा महादेव, नागद्वार या स्थळांस जाता येते. हे ठिकाण सातपुडा पर्वतश्रेणीतील असून पूर्वी इंग्रजांची येथे छावणी होती.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
पंचमढीतील पांडव गुहा

पंचमढी हे समुद्रसपाटीपासून १,०६७ मीटर उंचीवर आहे. येथे घनदाट जंगल, खळखळाट करणारे जलप्रपात आणि तलाव आहेत. येथील जंगलात सिंह, बिबट्या, चितळ, सांबर, गवा, चिंकारा, अस्वल, रानरेडा असे अनेक जंगली प्राणी आहेत. येथील एक गुंफा ही पुरातत्त्वदृष्ट्या महत्त्वाची आहे, तिच्यात शैलचित्र मिळाले आहे.

नागद्वार यात्रा, पंचमढ़ी संपादन

मध्यप्रदेशात दरवर्षी केदारनाथ यात्रेसारखीच नागद्वार यात्रा असते.

पंचमढी येथील काही प्रेक्षणीय स्थळे :

पंचमढीच्या आसपास या ठिकाणांखेरीज अन्य प्रेक्षणीय स्थाने आहेत.

कसे जावे संपादन

'रेल्वेने ': मुंबई-इटारसी-हावरा या रेल्वेमार्गावर पिपरिया हे पंचमढीला सर्वांत जवळचे रेल्वे स्टेशन आहे.

'रस्ता : पंचमढी हे भोपाळ, इंदूर, नागपूर, हुशंगाबाद, छिंदवाडापिपरिया या शहरांना सरळ जोडले गेले आहे. पिपरियाहून टॅक्सी सेवा उपलब्ध आहे.

'हवाई मार्ग ' : भोपाळ हा जवळचा विमानतळ आहे. भोपाळ विमानतळावरून दिल्ली, ग्वाल्हेर, इंदूर, मुंबई, रायपूर आणि जबलपूर या भारतातील प्रमुख शहरांत जाण्यासाठी विमानसेवा आहे.