Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
पर्वती - मराठीपिडिया Jump to content

पर्वती

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
पर्वती टेकडीचे पायथ्यानजीकच्या निवासी उपनगरातून घेतलेले छायाचित्र (इ.स. २००८ च्या सुमारास)

पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय दिशेस उभी असलेली टेकडी आहे. पर्वताई देवीच्या नावावरून टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे. सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.[] या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी तावरे पाटील यांच्या कडून जमीन घेऊन वदेवेश्वर मंदिर बांधवून घेतले. २३ एप्रिल, इ.स. १७४९ रोजी हे मंदिर उभे राहिले [].[] टेकडीवर नानासाहेब पेशव्यांचे स्मारक ,पेशवे संग्रहालय, पायथ्याला प्राचीन लेणी आहेत.

मुख्य मंदिर आणि अन्य मंदिरे[संपादन | स्रोत संपादित करा]

पर्वतीवर देवदेवेश्वराच्या मुख्य मंदिराशिवाय कार्तिकेय, विष्णू, विठ्ठल-रुक्मिणी इत्यादी दैवतांची मंदिरे आहेत. यांपैकी कार्तिकस्वामी मंदिर, श्रीविष्णू मंदिर, होमशाळा इत्यादी इमारती देवदेवेश्वर मंदिरानंतरच्या काळात बांधल्या गेल्या. पानिपताच्या तिसऱ्या लढाईतील मराठ्यांच्या प्रचंड हानीमुळे खचून गेलेल्या नानासाहेब पेशव्यांचे प्राणोत्क्रमण जून, इ.स. १७६१ मध्ये येथील होमशाळेत झाले[].मुख्य मंदिर आधुनिक हिंदू शैलीत बांधलेले आहे. त्याचा कळस उंच व निमुळता असून त्यावर सोन्याचा मुलामा दिला आहे. मंदिर परिसरातील चौकोनी बैठकीच्या चार कोपऱ्यात चार लहान मंदिरे आहेत ती सूर्यदेव (आग्नेय), गणेश (नैर्ऋत्य), अंबाबाई (वायव्य) आणि विष्णू (ईशान्य) यांना समर्पित आहेत. इस १७६६ मध्ये माधवराव पेशव्यांनी ज्याच्यात चार लहान मंदिरे आणि एक मुख्य मंदिर यांचा समावेश होतो, असे हे शिव पंचायतन विकसित केले. मंदिरात भगवान शंकर, पार्वती आणि गणेश यांच्या धातूच्या मूर्ती आहेत. त्या तीन मूर्ती १७४९ मध्ये मुळात सोन्याच्या बनवलेल्या होत्या; १९३२ मध्ये त्या चोरीला गेल्या व त्याजागी त्याच्या हुबेहूब दुसऱ्या अन्य धातूच्या मूर्ती ठेवल्या गेल्या. मुख्य मंदिराच्या पश्चिमेला भगवान कार्तिक स्वामींचे मंदिर आहे. तिथे महिलांना प्रवेश वर्ज्य आहे.

चित्रदालन[संपादन | स्रोत संपादित करा]

पर्वतीसंबंधी पुस्तके[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:विस्तार साचा:पुणे