पळसगड

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:बदल पळसगड हा किल्ला महाराष्ट्रातल्या ठाणे जिल्ह्यातील माहुलीजवळ आहे. येथे एकाच किल्ल्याचे तीन भागांत विभाजन झाले आहे. उत्तरेकडील भागाला पळसगड असे म्हणतात, तर दक्षिणेकडे भंडारगड आहे. या दोन्हीच्या मध्ये माहुलीचा किल्ला आहे.[१] [२]


दुर्गत्रिकुट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागातील पळसगडावर सह्याद्री प्रतिष्ठानकडून दुर्ग अवशेष शोध मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान अर्धवर्तुळाकार दगडी तुटलेली कमान समोर आली असून येथील इतर दगड बाजूला करून ही कमान मोकळी करण्यात आली. किल्ल्याच्या इतिहासामध्ये तीन दरवाजांचा उल्लेख होत असून महादरवाजा, कल्याण दरवाजा आणि हनुमान दरवाजा अशा नोंदी असल्या तरी या किल्ल्यावरील चौथा गणेशदरवाजा या दुर्गप्रेमींनी समोर आणला आहे. या दरवाजावर गणपतीची मूर्ती असल्यामुळेच त्याचा उल्लेख गणेश दरवाजा करण्यात आला आहे, असे सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.[३]

संदर्भ आणि नोंदी

साचा:संदर्भयादी