पाचोरा
पाचोरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर आणि पाचोरा तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
दळण वळण[संपादन | स्रोत संपादित करा]
पाचोरा शहर हे लोहमार्ग व राज्य महामार्गांनी इतर शहरांशी जोडलेले आहे. लोहमार्गावरील भुसावळनजीक असलेले हे मध्य रेल्वेवरील मुंबई-दिल्ली मार्गावरील एक जंक्शन स्टेशन आहे. पाचोरा ते जामनेर नॅरो गेज (narrow gauge) रेल्वे मार्ग आहे. महाराष्ट्र राज्य महामार्ग क्र. १९ (मालेगाव-चाळीसगाव-भडगाव-पाचोरा-पहूर) व महाराष्ट्र राज्य महामार्ग क्र. १८४ (जळगाव-पाचोरा-सिल्लोड) यांनी हे शहर जोडले गेले आहे.
भूगोल[संपादन | स्रोत संपादित करा]
पाचोरा तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ८१३ चौर.किमी. आहे, तर शहराचे क्षेत्रफळ १८.३५ चौ.किमी. आहे. पाचोरा तालुक्याच्या उत्तरेस जळगाव, पुर्वेस जामनेर, दक्षिणेस सोयगाव तर पछ्शिमेस भडगाव व एरंडोल हे तालुके आहेत.
पर्यटन[संपादन | स्रोत संपादित करा]
उद्योग[संपादन | स्रोत संपादित करा]
कृषी[संपादन | स्रोत संपादित करा]
केळी व कापुस हे मुख्य कृषी उत्पादने घेतली जातात.